Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 11:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्या दिवशी ती मोडली; तेव्हा ज्यांनी माझे ऐकले होते असे त्या कळपांत असलेले अतिशय दुबळे समजले की, हे परमेश्वराचे वचन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 म्हणून त्या दिवसापासून करार संपुष्टात आला आणि त्या कळपातील माझ्याकडे निरखून पाहणारे अतिशय अशक्तांची खात्री पटली की हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्या दिवशी तो करार रद्द झाला, आणि माझ्याकडे पाहणाऱ्या अत्याचार होत असलेल्या मेंढरांच्या कळपास कळले की हे याहवेहचे वचन होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 11:11
27 Iomraidhean Croise  

ह्याखेरीज आणखी सौदागर व व्यापारी आणीत; आणि अरबस्तानचे सर्व राजे व देशाचे सुभेदार शलमोनाकडे सोने, चांदी आणीत.


कारण परमेश्वर दरिद्र्यांचे ऐकतो; बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही.


राष्ट्राच्या जासुदांना काय उत्तर द्यावे? “परमेश्वराने सीयोन स्थापली आहे; त्याच्या लोकांपैकी दीनदुर्बळ तिच्यात आश्रय करून आहेत.”


तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.


परमेश्वर याकोबाच्या घराण्यापासून आपले मुख फिरवतो; त्याची वाट मी पाहतो, त्याची आशा धरतो,


तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल माझ्याकडे पहारेकर्‍यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, ‘बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे.’ तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे.


मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणार्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.


मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील.


तरी काय करावे हे त्यांना सुचेना; कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.


तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य यरुशलेमेत होता; तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता.


तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.


त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करत होता.


मग त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.’


त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवल्यावर हे गीत त्यांच्यासमोर साक्ष देईल, कारण ते त्यांच्या संतानाच्या मुखी सदोदित राहील. ज्या देशात त्यांना घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली होती त्यात त्यांना अजून नेलेही नाही तोच त्यांच्या मनात काय काय चालले आहे हे मी जाणून आहे.”


कारण मला ठाऊक आहे की, मी मेल्यावर तुम्ही अगदी बिघडून जाल; ज्या मार्गाने चालण्याची मी तुम्हांला आज्ञा केली आहे तो तुम्ही सोडून द्याल; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते तुम्ही कराल व आपल्या हातच्या कृतीने त्याला चीड आणाल म्हणून पुढील काळी तुमच्यावर विपत्ती येऊन पडेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan