Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 11:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे लबानोना, आपल्या वेशी उघड म्हणजे अग्नी तुझे गंधसरू भस्म करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे लबानोना, अग्नीने आत शिरुन तुझे गंधसरू जाळून टाकावेत म्हणून तू आपली दारे उघड.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे लबानोना, आपल्या वेशी उघड, म्हणजे अग्नी तुझ्या गंधसरूच्या वृक्षांना भस्म करेल!

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 11:1
14 Iomraidhean Croise  

अगे लबानोनवासिनी, गंधसरूंवर घरटे करणारे, तुला तिडका येतील; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तू वेणा देशील तेव्हा तू कशी धापा टाकशील!”


पाहा, अश्शूर हा लबानोनाचा एक गंधसरू असून त्याला सुंदर फांद्या फुटल्या, त्याची छाया गर्द झाली, तो उंच वाढून त्याचा शेंडा मेघमंडळास जाऊन भिडला.


लबानोनावर केलेला जुलूम तुला घेरील, जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यामुळे असे होईल.


तू पुष्कळ राष्ट्रांना लुटले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम, ह्यामुळे असे होईल.


डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा; त्याने मी प्रसन्न होईन व माझा महिमा प्रकट करीन, असे परमेश्वर म्हणतो.


मी त्यांना मिसर देशातून माघारी आणीन; अश्शूर देशातून त्यांना एकत्र करीन; गिलाद व लबानोन ह्यांच्या भूमीवर त्यांना आणीन; त्यांना जागा पुरायची नाही.


हे देवदारू, हायहाय कर; कारण गंधसरू पडला आहे, वृक्षराज नष्ट झाले आहेत, बाशानाच्या ओक वृक्षांनो, हायहाय करा, कारण निबिड वन जमीनदोस्त झाले आहे.


त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारांना लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन; ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना खाऊन टाकतील; यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल.


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan