Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी शीळ घालून त्यांना जमा करीन; कारण मी त्यांना सोडवून घेतले आहे; त्यांची पूर्वी वृद्धी झाली तशी ते वृद्धी पावतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 “मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन कारण मी त्यांना वाचवीन आणि त्यांची संख्या पूर्वी होती तशीच असंख्य होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी त्यांना संकेत देईन, आणि त्यांना एकत्र करेन. मी निश्चितच त्यांना सोडवेन; ते पुन्हा पूर्वीसारखेच असंख्य होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 10:8
25 Iomraidhean Croise  

यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनार्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.


इस्राएलवंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले; ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला.


तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे.


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


तो दूरच्या राष्ट्रांसाठी निशाण उभारतो व शीळ घालून दिगंतापासून त्यांना बोलावतो; पाहा, ते त्वरा करून धावत येत आहेत.


परमेश्वराने उद्धरलेले जन परततील व जयजयकार करत सीयोनेस येतील; त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील; त्यांना आनंद व उल्लास प्राप्त होईल; दुःख व उसासे पळ काढतील.


त्या दिवशी असे होईल की मिसरी नदीच्या फाट्यांच्या शेवटांस असलेल्या माशा व अश्शूर देशात असलेल्या मधमाशा ह्यांना परमेश्वर शीळ घालून बोलावील.


त्या सगळ्या येऊन खडकाळ खोर्‍यांत, खडकांच्या कपारींत, सगळ्या काटेरी झुडपांत व सर्व कुरणांत उतरतील.


आकाशसैन्याची गणती करवत नाही, समुद्राच्या वाळूचे मापन करवत नाही, त्याप्रमाणे माझा सेवक दावीद ह्याची संतती व सेवा करणारे लेवी ह्यांना मी बहुगुणित करीन.”


तथापि इस्राएलाची संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अपरिमित व अगण्य होईल आणि असे घडून येईल की, ‘तुम्ही माझे लोक नव्हत’ असे जेथे त्यांना म्हणत, तेथे ‘तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात,’ असे त्यांना म्हणतील.


हे याकोबा, मी तुम्हां सर्वांना निश्‍चये एकत्र करीन, इस्राएलाचे अवशेष मी निश्‍चये जमा करीन; मी त्यांना बस्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन; लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणांमधल्या कळपांप्रमाणे ते गजबजतील.


तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन.


अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.


आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.


ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan