Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण तेराफिम मुर्तींनी निरर्थक गोष्टी केल्या आहेत, दैवज्ञांनी लबाडीचा दृष्टांत पाहिला आहे; ते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आणि खोटा धीर देतात; म्हणून लोक मेंढरांसारखे भटकत आहेत आणि त्यांचा कोणी मेंढपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मूर्ती लबाड बोलतात, दैवप्रश्न करणारे खोटे दृष्टान्त बघतात; ते जी स्वप्ने सांगतात ती खरी नसतात, त्यांनी केलेले सांत्वन व्यर्थ असते. म्हणून लोक मेंढपाळ नसल्यामुळे जुलमाच्या दबावाखाली मेंढराप्रमाणे भटकतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 10:2
44 Iomraidhean Croise  

लाबान आपल्या मेंढरांची कातरणी करायला गेला असता राहेलीने आपल्या बापाच्या तेराफीम (गृहदेवता) चोरल्या.


मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळावाचून असलेल्या मेंढरांसारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसले; तेव्हा परमेश्वर म्हणाला, ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”


तुम्ही तर लबाड्या प्रवृत्त करणारे आहात. तुम्ही सर्व कवडीमोल वैद्य आहात.


तुमच्या उत्तरात दगा भरलेला आहे, तर तुम्ही माझे व्यर्थ सांत्वन का करता?”


पाहा, ते सर्व व्यर्थ आहेत, त्यांची कृत्ये निरर्थक आहेत; त्यांच्या ओतीव मूर्ती वायफळ व शून्यवत आहेत.


खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.


कोरीव मूर्ती घडवणारे सर्व शून्यवत आहेत; त्यांचे रम्य विषय काही कामाचे नाहीत; त्याविषयी साक्ष देणार्‍यांना दृष्टी नाही किंवा अक्कल नाही; म्हणून ती देणार्‍यांना लज्जा प्राप्त होईल.


माझी कोणाशी तुलना कराल? मला कोणाशी समान लेखाल? माझी कोणाशी बरोबरी कराल की जेणेकरून ते माझ्याशी समान ठरतील?


ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत; मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप!


मग मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, पाहा, संदेष्टे त्यांना म्हणत आहेत, ‘तुम्ही तलवार पाहणार नाही, तुम्हांला दुष्काळ गाठणार नाही; तर ह्या स्थळी मी तुम्हांला खरी शांती देईन.”’


विदेश्यांच्या निरुपयोगी दैवतांत कोणी पर्जन्य देणारी आहेत काय? आकाशाला वृष्टी करता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना? आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू ह्या सर्वांना उत्पन्न केले आहेस.


मला तुच्छ मानणार्‍यांना ते म्हणत राहतात की, ‘परमेश्वर बोलला आहे : तुम्हांला शांती प्राप्त होईल;’ आपल्या अंत:करणाच्या हट्टाप्रमाणे चालणार्‍या सर्वांस ते म्हणतात की, ‘तुमच्यावर काही अरिष्ट येणार नाही.’


परमेश्वर म्हणतो, पाहा, जे संदेष्टे खोटी स्वप्ने संदेश म्हणून सांगतात त्यांच्याविरुद्ध मी आहे; ते माझ्या लोकांना आपल्या लबाडीने व आपल्या अमर्याद भाषणाने बहकवतात; मी तर त्यांना पाठवले नाही व आज्ञापिलेही नाही; ते ह्या लोकांचे बिलकूल हित करीत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.


कारण मी तुम्हांला तुमच्या देशातून घालवावे, तुम्हांला हाकून लावावे व तुम्ही नष्ट व्हावे म्हणून ते तुम्हांला खोटा संदेश देतात.


जे संदेष्टे तुम्हांला सांगतात की, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करू नका’ त्यांची वचने ऐकू नका; कारण ते तुम्हांला खोटा संदेश देतात.


तुमचे संदेष्टे, तुमचे दैवज्ञ, तुमचे स्वप्नद्रष्टे, तुमचे मांत्रिक व तुमचे जादूटोणा करणारे तुम्हांला म्हणतात की, ‘बाबेलच्या राजाची सेवा करू नका.’ त्यांचे तुम्ही ऐकू नका;


मग यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला : “हनन्या, आता हे ऐक; परमेश्वराने तुला पाठवले नाही; तू ह्या लोकांना लबाडीवर भरवसा ठेवायला लावलेस.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुमच्यात वागणारे संदेष्टे व तुमचे दैवज्ञ ह्यांनी तुम्हांला फसवू नये; तुम्ही ज्यांना स्वप्ने पाहण्यास लावता त्या स्वप्नद्रष्ट्यांचे ऐकू नका.


तुमच्या ज्या संदेष्ट्यांनी भविष्य केले की, ‘बाबेलचा राजा तुमच्यावर व ह्या देशावर चाल करून येणार नाही ते कोठे आहेत?’


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


तुझ्या द्वारे मी मेंढपाळ व त्याचा कळप ह्यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्या द्वारे शेतकरी व त्याच्या बैलांची जोडी ह्यांचे तुकडे तुकडे करीन; आणि तुझ्या द्वारे मी अधिपतींचे व नायब अधिपतींचे तुकडे तुकडे करीन.


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात.


शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घाय ते वरवर बरा करतात.


तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टान्त पाहिला; तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही; तर त्यांनी तुझ्यासंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टान्त पाहिले.


कारण बाबेलचा राजा चवाठ्यावर, दोन रस्ते फुटतात तेथे शकुन पाहण्यासाठी थांबला आहे; तो भात्यांतले बाण हलवून प्रश्‍न पाहत आहे, तेराफीमांना1 कौल लावत आहे, यज्ञपशूच्या काळजावरून शकुन पाहत आहे.


ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.


त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली; ती सर्व वनपशूंना भक्ष्य होऊन त्यांची दाणादाण झाली.


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत; माझी मेंढरे सर्व वनपशूंना भक्ष्य झाली आहेत; माझ्या मेंढपाळांना मेंढरांची शुद्ध नाही. मेंढपाळ आपणच चरतात, पण मेंढरांना चारत नाहीत.


कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.


हे याकोबा, मी तुम्हां सर्वांना निश्‍चये एकत्र करीन, इस्राएलाचे अवशेष मी निश्‍चये जमा करीन; मी त्यांना बस्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन; लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणांमधल्या कळपांप्रमाणे ते गजबजतील.


कोरीव मूर्ती ही मूर्तिकाराने कोरून केली ह्यात काय लाभ? खोटा कौल देणार्‍या ओतीव मूर्तीवर मूर्तिकार, मुक्या मूर्ती करणारा, श्रद्धा ठेवतो ह्यात काय लाभ?


कळपास सोडून देणार्‍या कवडीमोल मेंढपाळास धिक्कार असो! त्याच्या बाहूवर व त्याचा उजव्या डोळ्यावर तलवार चालेल; त्याचा बाहू सुकेल, त्याचा उजवा डोळा अगदी अंध होईल.”


तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल; तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा-मेंढरांप्रमाणे होणार नाही.”


तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते.


येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बर्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.


आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हांला प्रत्यय आला, आणि तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हांला सुचवले,


तेव्हा लईश प्रदेश हेरायला गेलेले पाच जण आपल्या बांधवांना म्हणाले, “ह्या घरात एक एफोद, तेराफीम (कुलदेवता), एक कोरीव मूर्ती आणि एक ओतीव मूर्ती आहे हे तुम्हांला माहीत आहे काय? आता काय करायचे ह्याचा विचार करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan