Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तो संकटसमुद्रातून पार जाऊन समुद्रलहरींना दबकावील; नील नदीचे सर्व गहिरे पाणी सुकून जाईल. अश्शूराचा गर्व उतरेल, मिसरचे राजवेत्र निघून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 ते जाचजुलूमाच्या समुद्रातून जातील; ते गर्जनाऱ्या समुद्राला दबकावतील, ते नाईल नदीला सुकवतील व तिचे सर्व तळ उघडे पाडतील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसराच्या सत्तेचा राजदंड त्यांच्यापासून काढून घेतला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 ते संकटांच्या समुद्रातून प्रवास करतील; उफाळणाऱ्या लाटा शांत केल्या जातील आणि नाईल नदीचे खोल पाणी शुष्क होईल. अश्शूरचा गर्व खाली करण्यात येईल व इजिप्तचा राजदंड निघून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 10:11
25 Iomraidhean Croise  

मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले;


एलीयाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, “एलीयाचा देव परमेश्वर कोठे आहे?” त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंगले आणि अलीशा पलीकडे गेला.


एलीयाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली तेव्हा पाणी दुभंगले; मग ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले.


त्यांनी बेखमीर भाकरीचा सण सात दिवस आनंदाने पाळला, कारण परमेश्वराने त्यांना आनंदित केले होते आणि इस्राएलाचा देव ह्याच्या मंदिराच्या कामी त्यांच्या हातांना जोर यावा म्हणून त्याने अश्शूरच्या राजाचे मन त्यांना अनुकूल केले होते.


हे पाहून समुद्र पळाला; यार्देन मागे हटली.


हे समुद्रा, तुला काय झाले म्हणून तू पळतोस? हे यार्देने, तुला काय झाले म्हणून तू मागे हटतेस?


मी आपल्या देशात अश्शूरचा चुराडा करीन, माझ्या पर्वतांवर त्याला पायांखाली तुडवीन; तेव्हा त्याचे जूं त्यांच्यावरून निघेल, त्यांच्या खांद्यांवरून त्याचे ओझे उतरेल.”


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.


मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन;’


ज्याने समुद्र आटवला, खोल सागराचे जल आटवले, उद्धरलेले पार उतरून जावेत म्हणून सागराच्या अगाध डोहांतून मार्ग केला, तो तूच नव्हेस काय?


हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो; पूर्वकाळच्या दिवसांतल्याप्रमाणे, प्राचीन युगातल्याप्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्नभिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगरास विंधणारा तूच नव्हेस काय?


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन आणि मिसर देशातला कोणीही ह्यापुढे अधिपती होणार नाही असे करीन; मिसर देश दहशतीने भरीन.


तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्शूराचा नाश करील; निनवे वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील.


सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्‍या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan