Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मी म्हणालो, ‘माझ्या प्रभू, हे कोण आहेत?’ तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत म्हणाला, ‘हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मी विचारले, “प्रभू, हे कोण आहेत?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत मला म्हणाला, “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मी विचारले, “माझ्या प्रभू, हे सर्व काय आहे?” एक स्वर्गदूत जो माझ्याशी बोलत होता, त्याने उत्तर दिले, “ते काय आहे हे मी तुला दाखवेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 1:9
17 Iomraidhean Croise  

तेव्हा स्वप्नात देवदूताने मला म्हटले, “याकोबा”; मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?”


जवळ उभे असलेल्यांपैकी एकाकडे मी गेलो व ह्या सर्व गोष्टींचे मर्म त्याला विचारले. तेव्हा त्याने मला ते कथन केले व ह्या सर्व गोष्टींचा अर्थ मला समजावून सांगितला.


तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला.


माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला मी विचारले, “ही काय आहेत?” त्याने मला म्हटले, “ज्यामुळे यहूदा, इस्राएल व यरुशलेम ही परागंदा झाली आहेत ती ही शृंगे.”


आणि पाहा, माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत जाऊ लागला तेव्हा दुसरा दिव्यदूत त्याला भेटण्यास आला.


मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत माझ्याकडे पुन्हा आला व जसे झोपेतून एखाद्यास जागे करतात तसे त्याने मला जागे केले.


मग मी त्याला विचारले, “दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूंना ही दोन जैतुनाची झाडे आहेत ती काय?”


मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत पुढे येऊन मला म्हणाला, “आता आपले डोळे वर करून काय जात आहे ते पाहा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan