Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 1:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 “मला रात्री दृष्टान्त झाला तो असा : एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता; त्याच्यामागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 “रात्र असतांना मला दृष्टांतात दिसले ते असे: तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक मनुष्य मी पाहिला आणि तो दरीतल्या मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा होता. त्याच्यामागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 रात्रीच्या वेळी मला एक दृष्टान्त मिळाला, एका तांबड्या घोड्यावर एक मनुष्य बसलेला मी पाहिला. तो एका खोऱ्यात मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या पाठीमागे तांबडे, तपकिरी व पांढरे असे दुसरे घोडे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 1:8
26 Iomraidhean Croise  

देव रात्री स्वप्नात येऊन अबीमलेखाला म्हणाला, “तू जी ही स्त्री आणली आहेस तिच्यामुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवर्‍याची बायको आहे.”


तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलाशी बोलला, “याकोबा, याकोबा.” तो म्हणाला, “काय आज्ञा?”


गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनाला दर्शन दिले; देवाने त्याला म्हटले, “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन.”


आपल्या सर्व नगरानगरांत व यरुशलेमेत त्यांनी लोकांना जाहीर करावे व कळवावे की, “पहाडावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी आणि दाट पालवीचे वृक्ष ह्यांच्या डाहळ्या आणून शास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे मांडव घालावेत.”


रात्री माणसे निद्रावश होतात अशा समयी मला दृष्टान्त होऊन मी विचारलहरींत मग्न झालो असता,


माझा वल्लभ माझा, व मी त्याची; तो आपला कळप भुईकमळांत चारत आहे.


माझा वल्लभ आपल्या बागेत, सुगंधी झाडांच्या ताटव्यात गेला आहे; तो उपवनात कळप चारण्यास, भुईकमळे वेचण्यास गेला आहे.


अरण्यात मी गंधसरू, बाभूळ, मेंदी व कण्हेर ह्यांची लावणी करीन व रानात सुरू, देवदारू व भद्रदारू एकत्र लावीन.


काटेर्‍याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल; ह्यावरून परमेश्वराचे नाव होईल; ते सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही.”


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


मग रात्री दृष्टान्तात हे रहस्य दानिएलास प्रकट झाले; त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला.


तेव्हा मी रात्रीच्या दृष्टान्तात पाहिले तर आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला; तो त्या पुराणपुरुषाकडे आला व त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले.


दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्‍ही दिशांचे वारे महासागरावर सुटले;


तेव्हा मेंदीच्या झुडपात उभे असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की, ‘पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने ज्यांना पाठवले ते हे :’


तेव्हा त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभे असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले की, ‘आम्ही पृथ्वीवरून फेरी करून आलो आहोत; पाहा, सर्व पृथ्वी स्वस्थ व शांत बसली आहे.’


दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्‍या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे :


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील; माझ्या लहानग्यांवर मी माझ्या हाताची छाया करीन.”


परमेश्वर त्यांना म्हणाला, “माझे शब्द ऐका, तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टान्तात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो.


यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैर्‍यांच्या पक्षाचा?”


इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही : जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, तो असे म्हणतो,


मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला; तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला.


तेव्हा दुसरा ‘घोडा’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते; त्याला मोठी तलवार देण्यात आली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan