Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 म्हणून तू त्यांना असे सांग : ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन,’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो: “तुम्ही माझ्याकडे फिरा!” हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे; “म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 म्हणून लोकांना सांग: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुम्हाकडे परत येईन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 1:3
33 Iomraidhean Croise  

तो आसाच्या भेटीस जाऊन त्याला म्हणाला, “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते ऐका; तुम्ही परमेश्वराच्याबरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हांला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हांला सोडील.


पण ते आपल्या संकटावस्थेत इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळून त्याला शरण गेले, तेव्हा तो त्यांना पावला.


पण जेव्हा जेव्हा त्यांना स्वास्थ्य मिळे तेव्हा तेव्हा ते तुझ्यासमोर दुष्कर्म करीत; ह्यामुळे तू त्यांना शत्रूंच्या हाती दिलेस व त्यांनी त्यांच्यावर सत्ता केली; तरी त्यांनी तुझ्याकडे वळून तुझा धावा केला, तो तू स्वर्गातून ऐकला आणि तुझ्या दयेच्या कृत्यांना अनुसरून तू त्यांना अनेक वेळा मुक्त केलेस.


तू सर्वसमर्थाकडे वळलास आपल्या डेर्‍यातून तू अधर्म दूर केलास, तर तुझी पुन्हा उभारणी होईल.


इस्राएल वंशजांनो, ज्याच्याशी तुम्ही फितुरी केली आहे त्याच्याकडे वळा.


तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे.


तरी त्यांना उपटून टाकल्यावर मी त्यांच्यावर पुनरपि दया करीन, व त्यांच्यातल्या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वतनात व जमिनीत परत आणीन.


ते म्हणाले, ‘तुम्ही सगळे आपल्या कुमार्गांपासून, आपल्या कर्मांच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे परमेश्वराने तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना जो देश युगानुयुग दिला आहे त्यात तुम्ही राहाल;


परमेश्वर म्हणतो, कोणी आपली बायको टाकली व ती त्याच्यापासून निघून जाऊन दुसर्‍याची झाली तर तो पुन्हा तिच्याकडे परत जाईल काय? अशाने देश भ्रष्ट होणार नाही काय? तू तर अनेक जारांशी व्यभिचार केला तरी तू माझ्याकडे पुन्हा फिरू पाहतेस काय? असे परमेश्वर म्हणतो.


“अहो मला सोडून जाणार्‍या मुलांनो, मागे फिरा, मी तुम्हांला वाटेवर आणीन.” पाहा, आम्ही तुझ्याकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस.


मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना मोठ्या निकडीने तुमच्याकडे पाठवून सांगत आलो की, ‘आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्यामागे लागू नका; म्हणजे जो देश मी तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल.’ पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही.


“परमेश्वर म्हणतो, हे इस्राएले, जर तू माझ्याकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्यासमोरून दूर करशील, बहकणार नाहीस,


तरी तुम्ही म्हणता, बापाच्या दुष्कर्माचा भार पुत्राने का वाहू नये? हे पाहा, मुलगा न्यायाने व नीतीने वागला, त्याने माझे सर्व नियम पाळून त्याप्रमाणे वर्तन केले तर तो खातरीने वाचेल.


तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या; आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा; हे इस्राएल घराण्या, तुम्ही का मरता?


कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणार्‍याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही; तर मागे फिरा व जिवंत राहा.


त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?


हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.


मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे.


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.


“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”


तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडले, ते पाळले नाहीत. माझ्याकडे वळा, म्हणजे मी तुमच्याकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत वळावे?’


Lean sinn:

Sanasan


Sanasan