Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला मी विचारले, “ही काय आहेत?” त्याने मला म्हटले, “ज्यामुळे यहूदा, इस्राएल व यरुशलेम ही परागंदा झाली आहेत ती ही शृंगे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी म्हणालो, “ही काय आहेत?” त्याने मला उत्तर दिले, “इस्राएल, यहूदा व यरूशलेम यांना ज्या शिंगांनी विखरले ती ही आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मी माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला विचारले, “हे काय आहे?” त्याने उत्तर दिले, “ही शिंगे आहेत, ज्यांनी यहूदीया, इस्राएल आणि यरुशलेम येथील लोकांची पांगापांग केली.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 1:19
20 Iomraidhean Croise  

तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया ह्याने लोखंडाची शिंगे करून आणली होती; तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ह्या शिंगांनी तू अरामी लोकांना हुंदडून त्यांचा नाश करशील.”


बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधत आहेत असे यहूदा व बन्यामीन ह्यांच्या शत्रूंनी ऐकले,


तेव्हा त्या देशाचे लोक यहूद्यांचे हात कमजोर करून त्यांना मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले.


अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत बिश्‍लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे वरकड स्नेही ह्यांनी पारसाच्या राजाला पत्र लिहून पाठवले; हे पत्र अरामी लिपीत व अरामी भाषेत लिहिले होते.


त्या वेळेस महानदाच्या पश्‍चिमेकडच्या प्रांताचा अधिपती ततनइ व शथर-बोजनइ व त्यांचे स्नेही हे सर्व त्यांच्याकडे येऊन म्हणाले, “हे मंदिर बांधण्याचा व हा कोट उभारण्याचा हुकूम तुम्हांला कोणी दिला आहे?”


फुशारकी मारणार्‍यांना मी म्हणालो, “फुशारकी मारू नका;” आणि दुर्जनांना म्हणालो, “आपल्या बळाचा तोरा मिरवू नका;


तुम्ही आपले नाक वर करू नका; ताठ मानेने बोलू नका.”


परमेश्वर म्हणतो, मवाबाचे शृंग मोडले आहे, त्याचा हात मोडला आहे.


तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटल्याचे मी ऐकले, “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे; पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”


जवळ उभे असलेल्यांपैकी एकाकडे मी गेलो व ह्या सर्व गोष्टींचे मर्म त्याला विचारले. तेव्हा त्याने मला ते कथन केले व ह्या सर्व गोष्टींचा अर्थ मला समजावून सांगितला.


तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल हर्ष करता; तुम्ही म्हणता, “आम्ही आपल्या सामर्थ्याने सत्ता संपादली नाही काय?”


त्याच्या सरदारांचे शीर तू ज्याच्या-त्याच्याच भाल्यांनी विंधतोस; माझा चुराडा करण्यासाठी ते माझ्यावर तुफानासारखे लोटले; गरिबांना गुप्तरूपे गिळावे ह्यातच त्यांना संतोष वाटतो.


मी आपले डोळे वर करून पाहिले आणि पाहा, चार शृंगे दृष्टीस पडली.


मी विचारले, “ह्यांचे येथे काय काम?” तो मला म्हणाला, “ज्यांनी यहूदास परागंदा करून कोणाला आपले डोके वर काढू दिले नाही ती ही शृंगे आहेत; परंतु आता त्यांना भेदरवून सोडावे व ज्या राष्ट्रांनी यहूदास परागंदा करण्यासाठी त्याच्या भूमीविरुद्ध आपले शृंग उचलले त्यांची शृंगे पाडून टाकावीत म्हणून हे आले आहेत.”


मी म्हणालो, ‘माझ्या प्रभू, हे कोण आहेत?’ तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत म्हणाला, ‘हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.’


तेव्हा मी विचारले, “तू कोठे जात आहेस?” तो मला म्हणाला, “यरुशलेमेचे माप घेण्यास म्हणजे तिची लांबीरुंदी पाहण्यास मी जात आहे.”


कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला, तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याचे मी योजले ह्याविषयी मला अनुताप झाला नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो;


Lean sinn:

Sanasan


Sanasan