Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्रा-विषयीची भांडणे, ह्यांपासून दूर राहा. कारण ती निरुपयोगी व व्यर्थ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पण मूर्खपणाचे वाद, वंशावळ, कलह आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 परंतु मूर्खपणाचे वाद, वंशावळ्या, कलह व नियमशास्त्राविषयींची भांडणे, ह्यांपासून दूर राहा कारण ती अहितकारक व व्यर्थ आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 परंतु नियमशास्त्राबद्दल मूर्खवाद, वंशावळ्या व वादविवाद आणि भांडणे टाळा, कारण हे निरर्थक आणि निरुपयोगी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 3:9
10 Iomraidhean Croise  

निष्फळ बोलून निरर्थक भाषणे करून तो वादविवाद करील काय?


मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.


आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्यांविषयी : “आपल्या सर्वांना ज्ञान आहे” हे आपल्याला ठाऊक आहे. “ज्ञान” फुगवते, प्रीती उन्नत्ती करते.


अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा; आणि सुभक्तीविषयी कसरत कर;


तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे; त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, शब्दयुद्ध करू नका; ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणार्‍यांच्या नाशास कारण होते.


अनीतीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा; अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील;


मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविषयांपासून दूर राहा, कारण त्यांपासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे.


ह्यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा ह्यांकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे.


तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही?


Lean sinn:

Sanasan


Sanasan