Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्त्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीनिकरणाने तारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर त्याच्या दयेनुसार त्याने आपले तारण केले, पवित्र आत्म्याद्वारे मिळालेले नव्या जन्माचे स्नान व त्याने केलेले नूतनीकरण ह्यांमधून अभिव्यक्त झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा त्यांनी आपले तारण केले, कारण हे आपण केलेल्या नीतिच्या कृत्यामुळे झाले नाही, तर ते त्यांच्या दयेने झाले आणि आपल्याला नवीन जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण दिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 3:5
46 Iomraidhean Croise  

मनुष्य निष्कलंक कोठून असणार? स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार?


मर्त्य मानव देवापुढे नीतिमान कसा ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला पुरुष निर्मळ कसा ठरेल?


मी निरपराध असलो तरी माझे तोंड मला अपराधीच ठरवील; मी निर्दोष असलो तरी तो मला दोषीच ठरवील.


हे इस्राएला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे; त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे;


तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नकोस; कारण तुझ्यापुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही.


हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.


शिवाय, हे प्रभू, तुझ्याच ठायी वात्सल्य आहे; कारण प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.


तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस.


हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणार्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.


तुझी नीतिमत्ता मी उजेडात आणीन; तुझ्या कर्मांविषयी म्हणशील तर त्यांपासून तुला काहीएक लाभ होणार नाही.


मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.


तुझ्यासमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकतोस; तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.


मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्‍चात्तापासाठी करतो खरा; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याचीदेखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.


आणि जे ‘त्याचे भय धरतात, त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे.’


‘आपल्या पूर्वजांस’ त्याने सांगितले ‘त्याप्रमाणे अब्राहाम’ व त्याचे ‘संतान ह्यांच्यावरील दया’ सर्वकाळ स्मरून


अशासाठी की, ‘आपल्या पूर्वजांवर’ त्याने ‘दया’ करावी, आणि त्याने ‘आपला’ पवित्र ‘करार’,


आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे; तिच्या योगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल.


ह्यात माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे.


आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मांनी नाही; नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. [पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही.]


देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.


म्हणून नियमशास्त्रातील कर्मांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरणार नाही; कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्त्वाची प्राप्ती


कारण नियमशास्त्रातील कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो.


पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणार्‍यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्त्व असा गणण्यात येतो.


मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरेवाईट केले नव्हते, तेव्हा निवडीसंबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे, तर पाचारण करणार्‍याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा,


ह्यावरून हे इच्छा बाळगणार्‍यावर नव्हे किंवा धावपळ करणार्‍यावर नव्हे, तर दया करणार्‍या देवावर अवलंबून आहे.


तर मग आपण काय म्हणावे? असे की, जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्त्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले.


आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात.


तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे; कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी ‘मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.’


तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे,


आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे;


अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे,


तू त्यांचा देश वतन करून घ्यायला जात आहेस हे तुझ्या पुण्याईमुळे नव्हे अथवा तुझ्या मनाच्या सात्त्विकतेमुळे नव्हे, तर त्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे; तसेच तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना परमेश्वराने दिलेले वचन खरे करावे म्हणून तुझा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देत आहे.


आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.


त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वत:च्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे; ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती;


परंतु जेव्हा आपला तारणारा देव ह्याची दया व मनुष्यांवरील प्रेम प्रकट झाले,


म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.


तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.


ते जर पतित झाले तर त्यांना पश्‍चात्ताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे; कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात, त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.


ते तुम्ही पूर्वी ‘लोक नव्हता,’ आता तर ‘देवाचे लोक आहात; तुम्हांला दया मिळाली नव्हती,’ आता तर ‘दया मिळाली आहे.’


त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता ‘बाप्तिस्मा’ येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे, असा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan