Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणार्‍या, मायाळू, आपापल्या नवर्‍याच्या अधीन राहणार्‍या, असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्‍या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्‍या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू व नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या, असे असावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल, म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 2:5
22 Iomraidhean Croise  

मग ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?” तो म्हणाला, “ती डेर्‍यात आहे.”


तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.”


तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिले आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.”


हे देवा, शत्रू कोठवर निंदा करणार? वैरी तुझ्या नावाची निर्भर्त्सना सदा करणार काय?


ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाहीत;


यापोमध्ये टबीथा उर्फ दुर्कस1 ह्या नावाची कोणीएक शिष्या होती; ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.


तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे ती त्यांनी त्याला दाखवली.


म्हणून तुम्हांला जे उत्तम लाभले आहे त्याची निंदा होऊ नये.


“तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,” असे शास्त्रात लिहिलेले आहे.


प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे अशी माझी इच्छा आहे.


तसे स्त्रियांनी मंडळ्यांत गप्प राहावे; कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही; नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे.


तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.


स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.


जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी.


जे दास म्हणून जोखडाखाली आहेत त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत असे मानावे; ह्यासाठी की देवाच्या नावाची व शिक्षणाची निंदा होऊ नये;


त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवर्‍यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan