Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्यांना लुबाडू नये तर सर्व प्रकारे इमानेइतबारे वागावे, ह्यासाठी की, त्यांनी सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्यांनी चोर्‍या करू नयेत तर सर्व गोष्टींत चांगला विश्वासूपणा दाखवावा; आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस, सर्व लोकात, त्यांनी शोभा आणावी; असा तू त्यांना बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 त्यांना लुबाडू नये, तर सर्व प्रकारे इमानेइतबारे वागावे, ह्यासाठी की, त्यांनी सर्व गोष्टींत आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा त्यांना बोध कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि त्यांनी चोरी करू नये, तर त्यांच्यावर भरवसा ठेवण्यास ते लायक आहेत असे दाखवावे. यासाठी की या सर्व गोष्टींत त्यांनी आपल्या तारणार्‍या परमेश्वराबद्दलच्या शिक्षणास शोभा आणावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 2:10
29 Iomraidhean Croise  

देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावेत म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्त्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल.


पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”


ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा दास कोण?


त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.


आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याच्यामुळे माझा आत्मा ‘उल्लासला आहे.’


तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला, आणि इस्राएलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.


जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे.


त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो तसे म्हणाला.


कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे.


म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला;


सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता;


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.


देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून : विश्वासातील माझे खरे लेकरू तीमथ्य ह्याला,


जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतींत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावेत.


जे दास म्हणून जोखडाखाली आहेत त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत असे मानावे; ह्यासाठी की देवाच्या नावाची व शिक्षणाची निंदा होऊ नये;


जर कोणी अन्य तर्‍हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती, व सुभक्त्यनुसार जे शिक्षण ते, मान्य करत नाही,


त्या जीवनाची आशा बाळगणार्‍या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल ह्याच्याकडून :


परंतु जेव्हा आपला तारणारा देव ह्याची दया व मनुष्यांवरील प्रेम प्रकट झाले,


परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.


ते सद्भाव धरून द्या, ह्यासाठी की, तुमच्याविरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणार्‍यांनी लज्जित व्हावे.


ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही; जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे.


अहिमलेखाने राजाला उत्तर केले, “आपल्या सर्व सेवकांमध्ये दाविदासारखा विश्वासू कोण आहे? तो तर राजाचा जावई असून आपल्या मंत्रीमंडळातला आहे, दरबारात त्याची मोठी प्रतिष्ठा आहे.


परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या नीतिमत्तेचे व सचोटीचे फळ देईल; आज परमेश्वराने आपणाला माझ्या हाती दिले होते तरी मी परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकला नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan