Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 अध्यक्ष2 हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे; तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनीतीने पैसे मिळवणारा नसावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा, तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका अनीतीने पैसे मिळविणारा नसावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 ख्रिस्तमंडळीचा बिशप हा देवाचा कारभारी आहे, म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो उर्मट, रागीट, मद्यपी, हिंसक व पैशासाठी हपापलेला नसावा,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 अध्यक्ष हे परमेश्वराच्या घराचे कारभारी आहेत म्हणून त्यांचे जीवन निर्दोष असावे. तर स्वच्छंदी अथवा लवकर रागास येणारे, मद्यपी अथवा भांडखोर, किंवा अनीतीने धन मिळविणारे नसावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 1:7
23 Iomraidhean Croise  

माझ्या जिवा, त्यांच्या मसलतीत शिरू नको; माझ्या शीला, त्यांच्या मंडळात सामील होऊ नको; कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला; त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या.


शीघ्रकोपी मूर्खपणा करतो; दुष्ट संकल्प योजणार्‍याचा लोक द्वेष करतात.


तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो;


ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणार्‍यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणार्‍यापेक्षा श्रेष्ठ होय.


मन उतावळे होऊ देऊन रागावू नकोस; कारण राग मूर्खांच्या हृदयात वसतो.


हेही द्राक्षारसाने भेलकांडत आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; याजक व संदेष्टा हे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षारसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; ते दृष्टान्त पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात.


आतल्या अंगणात जायच्या वेळी कोणाही याजकाने द्राक्षारस पिऊ नये.


“जेव्हा जेव्हा तुम्ही, म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शनमंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल; हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय;


ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा दास कोण?


तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण?


द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा;


फिलिप्पै येथील सर्व अध्यक्ष1 व सर्व सेवक2 ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणार्‍या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तीमथ्य ह्यांच्याकडून :


मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुर्‍या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावीस, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील1 नेमावेत.


तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्यात; सुशिक्षण देणार्‍या असाव्यात;


प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा;


तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर (देवाच्या इच्छेप्रमाणे) संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा;


विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan