Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुर्‍या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावीस, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील1 नेमावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मी तुला क्रेत बेटावर ह्यासाठी ठेवून आलो की, तू पूर्ण न झालेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरांत वडील नेमावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 मी तुला क्रे त येथे ह्यासाठी सोडून आलो की, तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला दिलेल्या आदेशानुसार तू प्रत्येक नगरात वडीलजन नेमावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मी तुला क्रेता बेटावर सोडले, जेणे करून तू तेथील उर्वरित कार्याची संपूर्ण व्यवस्था करावी आणि माझ्या आज्ञेनुसार प्रत्येक नगरात मंडळीचे वडील नेमावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 1:5
18 Iomraidhean Croise  

यरुशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत.


उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवत गेला; त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली.


मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली तेव्हापासून माझ्यासारखा संदेश प्रकट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व माझ्यापुढे प्रतिपादन करावे; त्यांनी भावी गोष्टी व आता होणार्‍या गोष्टी सांगाव्यात.


आणि त्या दगडांच्या ऐवजी दुसरे दगड बसवावेत आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा.


त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे ते बर्णबा व शौल ह्यांच्या हाती वडीलवर्गाकडे1 पाठवून दिले.


त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले; आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले.


क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”


ते बंदर हिवाळ्यात राहायला सोईचे नव्हते म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की, तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फेनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा; हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे.


मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून, ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले.


तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, “गृहस्थहो, तुम्ही माझे ऐकायचे होते, क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती.


मग पुष्कळ दिवसपर्यंत हळूहळू जात असता मोठ्या प्रयासाने कनिदासमोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना, म्हणून आम्ही क्रेताच्या किनार्‍यावरून सलमोनासमोर गेलो.


कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की, तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन.


सर्वकाही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.


ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांला देईल.


तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे.


मी मासेदोनियास जाताना तुला इफिसात राहण्याची विनंती केली, ह्यासाठी की, तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की, अन्य शिक्षण देऊ नका.


ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्या-पासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे.


त्या लोकांतील त्यांचाच कोणीएक संदेष्टा म्हणतो, “क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशू, आळशी व खादाड असतात.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan