Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 1:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्या लोकांतील त्यांचाच कोणीएक संदेष्टा म्हणतो, “क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशू, आळशी व खादाड असतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्यांच्यामधील एका संदेष्ट्याने म्हणले आहे की, ‘क्रेती लोक हे नेहमीच लबाड, पशुंसारखे खतरनाक, आळशी व खादाड आहेत.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 त्या लोकांतील त्यांचाच कोणी एक संदेष्टा म्हणतो की, क्रेत येथील लोक सदा लबाड, दुष्ट, पाशवी, आळशी व खादाड असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्यांच्याच कोणाएका संदेष्ट्याने सांगितले आहे, “क्रेतीय लोक लबाड, दुष्ट पशू, आळशी खादाड आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 1:12
12 Iomraidhean Croise  

‘कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहोत;’ तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की, ‘आपण वास्तविक त्याचा वंश आहोत.’


क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”


ते बंदर हिवाळ्यात राहायला सोईचे नव्हते म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की, तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फेनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा; हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे.


मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून, ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले.


मग पुष्कळ दिवसपर्यंत हळूहळू जात असता मोठ्या प्रयासाने कनिदासमोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना, म्हणून आम्ही क्रेताच्या किनार्‍यावरून सलमोनासमोर गेलो.


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.


ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणार्‍या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणार्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील;


मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की, तू अपुर्‍या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावीस, आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील1 नेमावेत.


पण हे लोक स्वतःला न कळणार्‍या गोष्टींविषयी निंदा करत असतात; नैसर्गिक नियमानुसार पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यासाठी जन्मलेल्या निर्बुद्ध पशूंसारखे ते आहेत; त्यांचा स्वत:च्या भ्रष्टतेतच नाश होईल.


ते सरळ मार्ग सोडून बहकले, आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने ते गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan