Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




तीता 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत; त्यांत विशेषेकरून सुंता झालेल्यांपैकी आहेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांस फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 पुष्कळ लोक निरर्थक बडबड करीत बंडखोरपणाने वागतात व काही लोकांना फसवितात. सुंता झालेल्या लोकांमधून धर्मांतरित झालेल्यांचा अशा लोकांमध्ये विशेषकरून समावेश आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 कारण अनावर, व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे पुष्कळ लोक आहेत, त्यांच्यात विशेषकरून सुंता झालेल्या गटाचे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




तीता 1:10
29 Iomraidhean Croise  

[अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, ढोंग्यानो! तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करता; ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.]


मग पेत्र यरुशलेमेस गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की,


तेव्हा काही जणांनी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, “मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.”


आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने (म्हणजे सुंता करून घ्यावी व नियमशास्त्र पाळावे असे सांगून) तुम्हांला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते.


मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे.


आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळेदेखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हांला गुलामगिरीत घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते;


अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या [तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून] तुम्हांला कोणी भुरळ घातली?


ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्‍या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणार्‍या, पण वाद मात्र उत्पन्न करणार्‍या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आताही सांगतो.


हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत;


आणि हेही ठाऊक आहे की, नियमशास्त्र नीतिमानांसाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनावर, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,


आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसर्‍यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.


आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.


ज्याला नेमायचे तो निर्दोष, एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत.


आपण धर्माचरण करणारे आहोत, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे.


मुलांनो, ही शेवटली घटका आहे, आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे.


“मी त्याला ओळखतो” असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही.


प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.


तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, ‘बलामाच्या’ शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने ‘मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे,’ हे अडखळण ‘इस्राएलाच्या संतानांपुढे’ ठेवण्यास बालाकाला शिकवले.


तरीपण तुझ्यात एक आहे की, तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस; मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan