Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ती तटासारखी असली तर तिच्यावर आम्ही रुप्याचा मनोरा बांधू; ती वेशीसारखी असली तर गंधसरूच्या फळ्यांनी तिची बंदिस्ती करू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ती जर भिंत असती तर, आम्ही तिच्याभोवती चांदीचा मनोरा उभारला असता. ती जर दार असती तर, तिच्या भोवती आम्ही गंधसरूच्या फळ्यांनी झाकले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 ती जर भिंत असती तर, आम्ही तिच्यावर चांदीचे बुरूज बांधू. ती जर दार असती तर आम्ही तिला, गंधसरूच्या फळ्यांनी झाकून टाकले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 8:9
14 Iomraidhean Croise  

त्याने त्या मंदिराच्या भिंतींना आतल्या बाजूने गंधसरूंच्या तक्त्यांची मढवणी केली; जमिनीपासून कडीपाटापर्यंत आतून आणि मंदिराच्या जमिनीला त्याने देवदारूची तक्तपोशी केली.


आम्ही तुझ्यासाठी चांदीचे टिके लावलेले सोन्याचे गोफ करू.


माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे; पाहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे; तो खिडकीतून डोकावत आहे तो झरोक्यांतून पाहत आहे.


बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील; पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील; मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल.


मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन; तुझ्यावर शांती सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.


ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरून काढतील; उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवतील.


आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.


तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले.


‘ह्यानंतर मी परत येईन, व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन;


तू नवीन घर बांधशील तेव्हा धाब्याला कठडा बांध; नाहीतर एखादा मनुष्य तेथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan