Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आमची एक धाकटी बहीण आहे, तिला अजून ऊर फुटले नाहीत; आमच्या ह्या बहिणीला मागणी येईल त्या दिवशी आम्ही तिचे काय करावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 (त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्या विषयी बोलतो) आम्हास एक लहान बहीण आहे, आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आमची एक लहान बहीण आहे, तिला अजून ऊरही फुटले नाहीत, तिच्या मागणीच्या दिवशी आम्ही आमच्या बहिणीसाठी काय करावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 8:8
29 Iomraidhean Croise  

माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन;


भुईकमळांमध्ये चरणार्‍या हरिणींच्या जुळ्या पाडसांप्रमाणे तुझे कुचद्वय आहे.


तुझे कुचद्वय हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखे आहे.


मी तटासारखी होते, माझे कुच बुरुजासारखे होते, म्हणून मी आपल्या वल्लभाच्या दृष्टीने कृपाप्रसादास पात्र झाले.


ती तटासारखी असली तर तिच्यावर आम्ही रुप्याचा मनोरा बांधू; ती वेशीसारखी असली तर गंधसरूच्या फळ्यांनी तिची बंदिस्ती करू.


तो परमेश्वर म्हणतो; “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे ह्यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”


तुझ्या डावीकडे आपल्या कन्यांसह राहणारी शोमरोन ती तुझी थोरली बहीण आणि तुझ्या उजवीकडे आपल्या कन्यांसह राहणारी सदोम ही तुझी धाकटी बहीण.


तू आपल्या वडील बहिणी व आपल्या धाकट्या बहिणी ह्यांचा अंगीकार करशील तेव्हा तू आपले आचरण स्मरून लज्जित होशील, आणि त्या तुझ्याबरोबर केलेल्या करारातल्या नसल्या तरी त्या कन्या म्हणून देईन.


शेतातले बीज वाढून सहस्रपट होते तशी मी तुझी वृद्धी केली; तू वाढून उंच झालीस, तू अति सुंदर झालीस, तुला ऊर फुटले, तुझे केस वाढले तरी तू उघडीनागडी होतीस.


तू नशा व शोक ह्यांनी व्याप्त होशील. तुझी बहीण शोमरोन हिचा पेला विस्मय व विध्वंस ह्यांचा आहे.


तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्‍यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.”


ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.


कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता.


तेथे रात्री पौलाला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा कोणीएक माणूस उभा राहून आपणाला विनंती करत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हांला साहाय्य कर.”


तेव्हा त्याने मला सांगितले, ‘जा, मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”’


रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणार्‍या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय; त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.


परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan