Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 8:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव; कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे; प्रेमसंशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे; त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे, आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे. त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी, किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तू मला आपल्या हृदयावर मोहर लावल्याप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे आपल्या भुजांवर मला ठेव; कारण मृत्यूप्रमाणेच प्रीती प्रबळ आहे, तिचा हेवा कबरेप्रमाणे आहे. तिचे उद्रेक अग्निज्वालेप्रमाणे उसळतात, ते खरोखर आगीचे लोळच असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 8:6
27 Iomraidhean Croise  

त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतले.


वीरांचे तीक्ष्ण बाण आणि रतमाच्या लाकडाचे निखारे.


हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.


माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत.


इस्राएलाच्या मुलांच्या नावांच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत, त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत, मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.


असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्‍यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल.


कारण ईर्ष्या पुरुषास संतप्त करते; सूड उगवण्याच्या दिवशी तो गय करणार नाही.


यरुशलेमाच्या कन्यांनो, मी तुम्हांला शपथ घालून विनंती करते की माझा वल्लभ तुम्हांला आढळला तर त्याला सांगा मी प्रेमज्वराने पीडित आहे.


पाहा, मी तुला आपल्या तळहातांवर कोरून ठेवले आहे; तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत.


“परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याचा पुत्र कोन्या2 माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असला तरी तेथून मी तुला काढून फेकून देईन.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो : त्या दिवशी, हे जरूब्बाबेला, शल्तीएलाच्या पुत्रा, माझ्या सेवका, मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखे करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी तुला निवडले आहे,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


मी यहोशवापुढे ठेवलेला चिरा पाहा; एका चिर्‍याला सात डोळे आहेत, पाहा, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करीन.


“इस्राएल लोकांपैकी अहरोन याजकाचा नातू, एलाजाराचा मुलगा फीनहास ह्याने त्यांच्यामध्ये माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएल लोकांवरील माझा संताप दूर केला म्हणून मी आपल्या ईर्ष्येने त्यांचा संहार केला नाही.


आणि तिच्या पतीच्या मनात परप्रेमशंका उद्भवली, आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय येऊन ती जर खरोखर भ्रष्ट झालेली असली अथवा तिच्या पतीच्या मनात परप्रेमशंका उद्भवून आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय आला आणि ती वास्तविक भ्रष्ट झालेली नसली,


मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.


तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.”


उलटपक्षी, “तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखार्‍यांची रास करशील.”


कारण तुमच्याविषयीची माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे; मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हांला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.


देव नाही अशाच्या योगे त्यांनी मला ईर्ष्येस पेटवले, व्यर्थ वस्तूंच्या योगे त्यांनी मला चिडवले; म्हणून ज्यांचे राष्ट्र नव्हे अशांच्या योगे मी त्यांना ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे त्यांना चिडवीन.


तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”


त्याला त्यांनी कोकर्‍याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले; आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan