Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी तुला आपल्या मातृगृही घेऊन गेले असते, तू मला शिकवले असतेस, मसाला घातलेला द्राक्षारस, माझ्या डाळिंबाचा रस मी तुला पिण्यास दिला असता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी तुला माझ्याबरोबर चालवून आईच्या घरात आणले असते. तू मला शिकवले असते. मी तुला मसाला घातलेला द्राक्षरस आणि माझ्या डाळिंबाचा रस प्यायला दिला असता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी तुझे मार्गदर्शन केले असते आणि तुला माझ्या आईच्या घरी घेऊन गेले असते— तिने मला शिकविलेला मसालेदार द्राक्षारस मी तुला, माझ्या डाळिंबाचा रस पिण्यास दिला असता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 8:2
16 Iomraidhean Croise  

त्याने आपले पशू कापले आहेत; त्याने आपला द्राक्षारस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे.


त्यांना सोडून मी अंमळ पुढे जाते तोच माझा प्राणप्रिय मला भेटला; मी त्याला धरून ठेवले; मी त्याला आपल्या मातृगृही आपल्या जननीच्या कोठडीत आणीपर्यंत सोडले नाही.


अगे माझे भगिनी, माझे वधू! तुझे प्रेम किती मनोरम आहे! तुझे प्रेम द्राक्षारसाहून कितीतरी मधुर आहे! तुझ्या उटण्यांचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्यांहून मधुर आहे!


आपण प्रातःकाळी उठून द्राक्षीच्या मळ्यात जाऊ; तेथे द्राक्षी फुटून तिच्या कळ्या उमलल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहू; तेथे मी आपले प्रेम तुला अर्पण करीन.


तुझे मुख उत्तम द्राक्षारसासमान व्हावे; तो माझ्या प्रियेप्रीत्यर्थ घशात नीट उतरतो; निद्रिस्तांच्याही तोंडांतून तो खाली सहज जातो.


तू माझ्या बंधूसारखा, माझ्या मातेचे स्तनपान केलेल्यासारखा असतास तर किती बरे होते! तू मला बाहेर रस्त्यात कोठे भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते. माझी कोणी अप्रतिष्ठा केली नसती.


तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता;1 कारण त्यांच्या द्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत;


वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.


त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे.


शिवाय अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.


तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नये; मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर;” कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म1 आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan