Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 8:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 माझ्या वल्लभा, त्वरा कर, सुगंधी वनस्पतींच्या डोंगरांवर हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा तू हो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 (ती तरुण स्त्री तिच्या प्रियकराशी बोलते) माझ्या प्रियकरा त्वरा कर. सुगंधी झाडांच्या पर्वतावर हरीणासारखा, तरुण हरीणीच्या पाडसासारखा तू हो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 माझ्या प्रियसख्या, लवकर ये, आणि हरिणीसारखा हो, किंवा सुगंधाने भरलेल्या डोंगरावरील तरुण काळवीटा प्रमाणे हो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 8:14
9 Iomraidhean Croise  

शिळोप्याची वेळ, छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत राहा. माझ्या वल्लभा, हरिणाप्रमाणे, मृगीच्या पाडसाप्रमाणे वियोगपर्वतांवर फीर.


यरुशलेमाच्या कन्यांनो, तुम्हांला वनातील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगते; माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका; तो राहील तितका वेळ राहू द्या.


माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे; पाहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे; तो खिडकीतून डोकावत आहे तो झरोक्यांतून पाहत आहे.


शिळोप्याची छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत मी गंधरसाच्या पर्वतावर, उदाच्या टेकडीवर जाऊन राहीन.


तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला.


तरीसुद्धा आपल्या वेशीच्या आत तुला वाटेल त्याप्रमाणे आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्याप्रमाणे पशू मारून खा; त्यांचे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे, कोणाही माणसाने खावे; मग तो अशुद्ध असो वा शुद्ध असो.


मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.


आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.


ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये, प्रभू येशू, ये.


Lean sinn:

Sanasan


Sanasan