Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 8:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता, त्याने तो बागवानांना सोपवून दिला होता; त्यातील फळांबद्दल प्रत्येकाने हजारहजार रुपये द्यायचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 (ती तरुणी स्वतःशी बोलते) बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता. त्याने तो मळा राखणाऱ्यांच्या स्वाधीन केला, त्याच्या फळांसाठी प्रत्येकाला एक हजार शेकेल द्यावे लागत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 बआल-हामोन येथे शलोमोनचा एक द्राक्षमळा होता; तो त्याने तेथील कुळांना खंडाने दिला. त्याचे फळ म्हणून प्रत्येकाने हजार चांदीची शेकेल द्यायची होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 8:11
11 Iomraidhean Croise  

तो सारेला म्हणाला, “पाहा, मी तुझ्या भावाला रुप्याची एक हजार नाणी देत आहे; त्यांच्या योगे तुझ्याबरोबरच्या सगळ्या लोकांसमोर तुझी भरपाई होईल. ह्या प्रकारे सर्वांसमक्ष तुझा निर्दोषीपणा सिद्ध झाला आहे.”


मी मोठमोठी कामे हाती घेतली, आपल्यासाठी घरेदारे बांधली, द्राक्षांचे मळे लावले;


मी काळीसावळी आहे हे मनात आणू नका, कारण मी उन्हाने होरपळले आहे. माझे सहोदर बंधू माझ्यावर संतप्त झाले; त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्यांची राखण करण्यासाठी ठेवले; पण माझ्या स्वत:च्या मळ्याची राखण मी केली नाही.


वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला; त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले.


आपण प्रातःकाळी उठून द्राक्षीच्या मळ्यात जाऊ; तेथे द्राक्षी फुटून तिच्या कळ्या उमलल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहू; तेथे मी आपले प्रेम तुला अर्पण करीन.


माझाही एक द्राक्षीचा मळा आहे; त्यावर माझी मालकी आहे; हे शलमोना, त्याबद्दलचे हजार रुपये तुझे आणि दोनशे रुपये फळांची राखण करणार्‍यांचे.


त्या दिवशी असे होईल की जेथे जेथे हजार रुपये किमतीचे हजार द्राक्षींचे वेल असत तेथे तेथे काटेकुटे होतील.


मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याच्याभोवती कुंपण घातले, द्राक्षारसासाठी कुंड खणले, माळा बांधला, आणि तो द्राक्षमळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशास निघून गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan