Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तुझे मुख उत्तम द्राक्षारसासमान व्हावे; तो माझ्या प्रियेप्रीत्यर्थ घशात नीट उतरतो; निद्रिस्तांच्याही तोंडांतून तो खाली सहज जातो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तुझे चुंबन सर्वात उंची द्राक्षरसाप्रमाणे आहे. तो घशात नीट उतरतो व झोपलेल्यांच्या ओठांवरून सहज गळतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुझे मुख उत्तम द्राक्षारसासारखे होवो. द्राक्षारस ओठांवरून दातांना स्पर्श करून, थेट माझ्या प्रिये कडे जावो,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 7:9
18 Iomraidhean Croise  

ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत.


द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो हे पाहत बसू नकोस.


अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे; कारण तुझा कंठ मधुर आहे; तुझे मुख रम्य आहे.


त्याची वाणी परम मधुर आहे; तो सर्वस्वी मनोहर आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ, माझा सखा, असा आहे!


मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे; ऐका! माझा वल्लभ दार ठोकत आहे! त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे; तो म्हणतो, “माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड; माझे डोके दवाने थबथबले आहे; माझी झुलपे रात्रीच्या दहिवरबिंदूंनी भरून गेली आहेत.”


समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे; कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे.


तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणार्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.


तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे.


म्हणून त्याचे नाव पत्करणार्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’


तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “लिही : प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan