Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी म्हटले, मी तालवृक्षावर चढून त्याच्या शाखा धरीन; तेव्हा तुझे कुच मला द्राक्षांच्या घोसांसमान व्हावेत, आणि तुझ्या नासिकेचा श्वास सफरचंदाच्या सुवासासमान व्हावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी विचार केला, मी खजुरीच्या झाडावर चढेन, त्याच्या फांद्यांना धरीन. तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी म्हटले, मी खजुरीच्या झाडावर आरोहण करेन आणि त्याच्या घोसांना धरीन; तुझे स्तन द्राक्षवेलीमध्ये द्राक्षांच्या गुच्छासारखे होवोत, आणि तुझा श्वास सफरचंदासारखा सुवासिक होवो,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 7:8
10 Iomraidhean Croise  

तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो; तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय; म्हणूनच कुमारी तुझ्यावर प्रेम करतात.


वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला; त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले.


मनुकांची पोळी देऊन माझ्या जिवाला आराम द्या; सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. मी प्रेमज्वराने पीडित झाले आहे;


हे उत्तरवायू, जागृत हो; दक्षिणवायू, तूही ये; माझ्या बागेवरून वाहा, तिचा परिमल पसर. माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करो.


तुझा हा बांधा तालवृक्षासारखा आहे; तुझे कुच द्राक्षांच्या घोसांसारखे आहेत.


मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.


द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे; डाळिंब, ताड व सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहेत; मानवजातीचा आनंद आटला आहे.


जो देव आम्हांला सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो, आणि सर्व ठिकाणी आमच्या द्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रकट करतो, त्याची स्तुती असो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan