Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे; तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत; तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुझे मस्तक कर्मेलासारखे आहे; आणि तुझ्या मस्तकावरचे केस जांभळ्या रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुझ्या मस्तकाने कर्मेल डोंगरासारखे तुला मुकुटमंडित केले आहे. तुझे केस जांभळ्या रंगाच्या शाही पडद्यासारखे आहे; या केशसंभारात राजा बंदिस्त झाला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 7:5
18 Iomraidhean Croise  

मग तो म्हणाला, “पहाट होत आहे, मला जाऊ दे.” तो म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही.”


हे देवा, त्यांनी तुझ्या स्वार्‍या पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या स्वार्‍या त्यांनी पाहिल्या आहेत.


याकोबाच्या सर्व वसतिस्थानांहून सीयोनेची द्वारे त्याला अधिक प्रिय आहेत.


रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो.


आमच्या घराच्या तुळया गंधसरूच्या आहेत; आमची तक्तपोशी सुरूची आहे.


अहा! तू सुंदर आहेस! माझ्या सखे, तू सुरूप आहेस! तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात. तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.


तुझी मान दाविदाने शस्त्रागारासाठी बांधलेल्या बुरुजासारखी आहे, त्यावर सहस्र ढाली व वीरांची सगळी कवचे लटकत असतात.


त्याचे शिर बावनकशी सोन्यासारखे आहे; त्याची झुलपे कुरळी व डोमकावळ्यासारखी काळी कुळकुळीत आहेत.


ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.


तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार; तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडीत एकान्ती राहतात त्यांना चार; प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे.


हेशबोन हे अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याचे नगर होते; त्याने मवाबाच्या पूर्वीच्या राजाशी लढाई करून आर्णोनेपर्यंतचा त्याचा सर्व देश काबीज केला होता.


कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”


जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”


त्याने सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले;


तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे; तो आदी, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे.


असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते.


‘त्याचे डोके’ व ‘केस बर्फासारख्या पांढर्‍या लोकरीसारखे,’ पांढरे होते; ‘त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते,’


Lean sinn:

Sanasan


Sanasan