Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 7:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 पुत्रदात्रीचा सुगंध सुटला आहे; आमच्या दारांवर नाना प्रकारची नव्याजुन्या बारांची उत्तम फळे आहेत; हे माझ्या वल्लभा, ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पुत्रदात्रीचा सुवास सुटला आहे, आणि आपल्या दाराजवळ नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आली आहेत. माझ्या प्राणप्रिया ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्या ठिकाणी दुदाफळाचे सुगंध दरवळत असतात, आणि दुर्मिळ फळे आमच्या दाराशीच उपलब्ध होतात नवीन आणि जुनीही फळे, ही सर्व माझ्या प्रियकरासाठी राखून ठेवली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 7:13
21 Iomraidhean Croise  

गव्हाच्या हंगामात रऊबेन शेतात गेला असता त्याला पुत्रदात्रीची फळे मिळाली, ती त्याने आपली आई लेआ हिला नेऊन दिली; तेव्हा राहेल लेआ हिला म्हणाली, “पुत्रदात्रीची फळे तुझ्या मुलाने आणली आहेत त्यांतली काही मला दे.”


वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला; त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले.


तुझ्या ठायी सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका अंकुरित झाली आहे.


हे उत्तरवायू, जागृत हो; दक्षिणवायू, तूही ये; माझ्या बागेवरून वाहा, तिचा परिमल पसर. माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करो.


खोर्‍यांतील हिरवीगार झाडेझुडपे पाहावी, द्राक्षलता फुटल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहावे म्हणून मी अक्रोडाच्या बागेत गेले होते.


तू माझ्या बंधूसारखा, माझ्या मातेचे स्तनपान केलेल्यासारखा असतास तर किती बरे होते! तू मला बाहेर रस्त्यात कोठे भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते. माझी कोणी अप्रतिष्ठा केली नसती.


तिच्या व्यापाराची प्राप्ती व तिची कमाई परमेश्वराला समर्पून पवित्र होईल; ती भांडारात ठेवणार नाहीत; तिचा संचय करणार नाहीत; तर जे परमेश्वराच्या सन्निध असतात त्यांना भरपूर खाण्यास मिळावे व त्यांनी उंची वस्त्रे ल्यावीत म्हणून तिच्या व्यापाराची प्राप्ती त्यांच्या कामी लागेल.


तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्‍या गृहस्थासारखा आहे.”


तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’


तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.


आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल3 त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत.


हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, “डोळ्यानहले नाही, कानाने जे ऐकले ने नाही व माणसाच्या ‘मनात जे अले नाही, ते आपणावर प्रीत करणार्‍यांसाठी देवाने सिद्ध केल आहे;”


(कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.)


आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.


आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.


भाषण करणार्‍याने, आपण देवाची वचने बोलत आहोत, असे बोलावे; सेवा करणार्‍याने, ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा; गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan