गीतरत्न 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आपण प्रातःकाळी उठून द्राक्षीच्या मळ्यात जाऊ; तेथे द्राक्षी फुटून तिच्या कळ्या उमलल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहू; तेथे मी आपले प्रेम तुला अर्पण करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सकाळीच उठून आपण द्राक्षमळ्यात जाऊ; द्राक्षवेली मोहरल्या आहेत की काय, त्यांना कळ्या आल्यात की काय ते पाहू. डाळिंबाच्या झाडांना फुले आलीत काय ते पाहू. आणि तिथे मी माझ्या प्रीतीचा वर्षाव करेन. Faic an caibideil |