Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे राजकन्ये, तुझे पादत्राणयुक्त पाय किती सुंदर आहेत! कुशल कारागिराच्या हातांनी घडवलेल्या रत्नहारांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो) हे राजकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात. कुशल कारागिराच्या हातच्या दागिन्यासारखा तुझ्या माड्यांचा बांक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे राजकन्ये, पायतणे घातलेले तुझे पाय किती सुंदर दिसतात! कुशल कारागिराने घडविलेल्या रत्नाप्रमाणे तुझ्या मांड्या वळणदार आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 7:1
13 Iomraidhean Croise  

मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव ह्याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले.


राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे; तिची वस्त्रे भरजरी आहेत.


न्यायाचा ऊरपटही कुशल कारागिराकडून तयार करावा, तो एफोदाप्रमाणे करावा; तो सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा, कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा.


त्यांच्यासाठी सणाचे चोळणे करावेत, म्हणजे त्यांचे अंग झाकलेले राहील; ते कंबरेपासून मांडीपर्यंत असावेत,


कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व तर्‍हेचे कसबी काम करणारे, कुशल कामाची योजना करणारे अशासारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.


तुझी नाभी वाटोळा गरगरीत पेलाच आहे; त्यात मिश्रित द्राक्षारसाची वाण नाही, तुझे उदर सभोवती भुईकमळे लावलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.


त्या पुतळ्याचे शीर उत्तम सोन्याचे, त्याची छाती व हात रुप्याचे, त्याचे पोट व मांड्या पितळेच्या,


पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला,


आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”


शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा,


सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता;


असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan