Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 पण माझी कपोती, माझी विमला अशी एकच; ती आपल्या आईची एकुलती एक, आपल्या जननीची लाडकी आहे; तिला पाहून कन्यांनी धन्य म्हटले, राण्यांनी व उपपत्नींनी तिची प्रशंसा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पण माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट एकच आहे, ती तिच्या आईची एकुलती एक विशेष मुलगी आहे, आपल्या जननीची आवडती आहे. माझ्या नगरातील कन्यांनी तिला पाहिले आणि तिला आशीर्वादित म्हटले, राण्यांनी आणि उपपत्नींनीसुध्दा तिची स्तुती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पण हे माझ्या कबुतरे, तू परिपूर्ण, व निराळी आहेस, तिच्या आईची एकुलती एक कन्या असून, जिने तिला जन्म दिला तिची लाडकी आहे. तरुण स्त्रियांनी तिला पाहून, धन्य म्हटले; राण्या व उपपत्नी यांनी देखील तिची प्रशंसा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 6:9
14 Iomraidhean Croise  

तेव्हा लेआ म्हणाली, “मी मोठी धन्य आहे ! इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील”; म्हणून तिने त्याचे नाव ‘आशेर’ ठेवले.


त्याच्या सातशे राण्या व तीनशे उपपत्न्या होत्या; त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकवले.


तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली, त्या समयी अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की, “परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.”


तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत; ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे.


अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे; कारण तुझा कंठ मधुर आहे; तुझे मुख रम्य आहे.


मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे; ऐका! माझा वल्लभ दार ठोकत आहे! त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे; तो म्हणतो, “माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड; माझे डोके दवाने थबथबले आहे; माझी झुलपे रात्रीच्या दहिवरबिंदूंनी भरून गेली आहेत.”


डोंगरमाथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे; पाहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणत नाही.


वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.


हे इस्राएला, तू धन्य आहेस! परमेश्वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्यासमान कोण आहे? तो तुझ्या साहाय्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तलवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील, तू त्यांची उच्च स्थाने पादाक्रांत करशील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan