Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मागे फीर, मागे फीर, अगे शुलेमकरिणी; मागे फीर, मागे फीर, म्हणजे आम्ही तुला डोळे भरून पाहू. शुलेमकरिणीचे तुम्ही काय पाहू इच्छिता? महनाईम येथील नृत्यासारखे नृत्य काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री, मागे फिर, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू, (ती तरुण स्त्री प्रियकराला म्हणते) त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता? जसे मी दोन नृत्य करणाऱ्याच्या रांगेत नृत्य करत आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 परत ये, शुलेमकन्ये परत ये; आम्ही तुला न्याहाळावे म्हणून परत ये, परत ये! महनाईमचे नृत्य पाहण्यासारखे तुम्ही शुलेमकन्येला का न्याहाळता?

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 6:13
23 Iomraidhean Croise  

त्यांना पाहून याकोब म्हणाला, “हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने ‘महनाईम’ (दोन सैन्ये) ठेवले.


व ‘अब्राहामाने’ त्याला ‘सर्व लुटीचा दशमांश’ दिला; तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे ‘शालेमाचा राजा’ म्हणजे शांतीचा राजा होता.


कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देहवासनांविरुद्ध आहे; ही परस्परविरोधी आहेत, ह्यासाठी की, जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये.


तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.


किंवा देव केवळ यहूद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? हो, आहे.


ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.


आणि त्याला म्हटले, “जा; शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यात धू.” मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला.


त्याप्रमाणे, पश्‍चात्ताप करणार्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.”


तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले.


“अहो मला सोडून जाणार्‍या मुलांनो, मागे फिरा, मी तुम्हांला वाटेवर आणीन.” पाहा, आम्ही तुझ्याकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस.


“हे लोक संथपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारतात आणि रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्या सहवासात आनंद पावतात;


अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे; कारण तुझा कंठ मधुर आहे; तुझे मुख रम्य आहे.


मी काळीसावळी आहे हे मनात आणू नका, कारण मी उन्हाने होरपळले आहे. माझे सहोदर बंधू माझ्यावर संतप्त झाले; त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्यांची राखण करण्यासाठी ठेवले; पण माझ्या स्वत:च्या मळ्याची राखण मी केली नाही.


शालेमात त्याचा मंडप आहे; व सीयोनेत त्याचे निवासस्थान आहे.


मग दावीद महनाइमाला गेला. इकडे अबशालोम इस्राएल लोकांसह यार्देनेपार गेला.


आणि शिलोच्या मुली नृत्यासाठी बाहेर पडताच द्राक्षमळ्यातून बाहेर निघावे आणि त्यांच्यातल्या एकेकीला एकेकाने धरून बायको करण्यासाठी बन्यामीन देशात अथवा प्रांतात घेऊन जावे.


यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


माझ्या राजवंशी लोकांच्या रथात माझ्या मनाने मला उचलून बसवले, ह्याचे मला भानच राहिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan