Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 नगरात फिरणारे जागल्ये मला भेटले; त्यांनी मला मार देऊन घायाळ केले; तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले. त्यांनी मला मारले, जखमी केले. कोटावरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पहारेकरी नगरात गस्त घालत असता त्यांना मी सापडले. त्यांनी मला मारहाण केली; मला जखमी केले; तटावरील पहारेकर्‍यांनी तर माझी ओढणी काढून घेतली!

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 5:7
25 Iomraidhean Croise  

नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही; कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन.


नगरात फिरणारे जागल्ये मला भेटले; मी त्यांना विचारले, “माझा प्राणप्रिय तुम्हांला कोठे आढळला काय?”


मी आपल्या वल्लभासाठी दार उघडले, आणि पाहते तर तो निघून गेला होता. तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाणावर नव्हता; मी त्याचा शोध केला, पण तो सापडला नाही; मी त्याला हाका मारल्या पण त्याने उत्तर दिले नाही.


यरुशलेमाच्या कन्यांनो, मी तुम्हांला शपथ घालून विनंती करते की माझा वल्लभ तुम्हांला आढळला तर त्याला सांगा मी प्रेमज्वराने पीडित आहे.


बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता, त्याने तो बागवानांना सोपवून दिला होता; त्यातील फळांबद्दल प्रत्येकाने हजारहजार रुपये द्यायचे होते.


आरसे, मलमलीची वस्त्रे, दुपट्टे व ओढण्या ह्यांची शोभा नाहीशी करील.


हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्‍यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका;


म्हणून मी त्यांच्यावर संदेष्ट्याच्या हातून कुर्‍हाड चालवली आहे, माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे; माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे.


“शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत;


मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य.


ते तुम्हांला सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणार्‍या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.


कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.


आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.


आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan