Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे; ऐका! माझा वल्लभ दार ठोकत आहे! त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे; तो म्हणतो, “माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड; माझे डोके दवाने थबथबले आहे; माझी झुलपे रात्रीच्या दहिवरबिंदूंनी भरून गेली आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 (ती तरुणी स्वतःशी बोलते) मी झोपलेली आहे. पण माझे हृदय स्वप्नात जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो आणि म्हणतो, माझे बहिणी, माझ्या प्रिये, माझ्या कबुतरा, माझ्या विमले! माझे डोके दहिवराने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या दवबिंदूने ओलसर झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी झोपले होते परंतु माझे हृदय जागेच होते. ऐका! माझा प्रियकर दरवाजा ठोकीत आहे: “माझ्यासाठी उघड, माझ्या भगिनी, माझ्या प्रिये, माझी कबुतरी, माझ्या सर्वांग सुंदरी. माझे डोके दवबिंदूने चिंब भिजले आहे, माझे केस रात्रीमुळे ओलसर झाले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 5:2
39 Iomraidhean Croise  

तेव्हा याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली; तिच्यावर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली.


जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य!


मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिसर देशातून बाहेर काढले, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन;


माझ्या मुला, तू आपले चित्त मला दे, माझे मार्ग तुझ्या दृष्टीला आनंद देवोत.


माझ्या वल्लभा, तूच सुरूप आहेस; तूच मनोहर आहेस; आमचा मंचक पर्णशय्या आहे.


माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल.


अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे; कारण तुझा कंठ मधुर आहे; तुझे मुख रम्य आहे.


हा माझ्या वल्लभाचा शब्द! पाहा तो डोंगरावरून उड्या मारत, टेकड्यांवरून दौडत येत आहे!


रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली; मी त्याला चोहीकडे पाहिले; पण तो मला आढळला नाही.


माझ्या प्रिये, तू सर्वांगसुंदर आहेस; तुझ्यात काही व्यंग नाही.


अगे माझे भगिनी, माझे वधू, तू माझे मन मोहित केले; तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या लहानशा हाराने माझे मन मोहिले.


त्याचे शिर बावनकशी सोन्यासारखे आहे; त्याची झुलपे कुरळी व डोमकावळ्यासारखी काळी कुळकुळीत आहेत.


मी आपल्या वल्लभासाठी दार उघडले, आणि पाहते तर तो निघून गेला होता. तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाणावर नव्हता; मी त्याचा शोध केला, पण तो सापडला नाही; मी त्याला हाका मारल्या पण त्याने उत्तर दिले नाही.


पण माझी कपोती, माझी विमला अशी एकच; ती आपल्या आईची एकुलती एक, आपल्या जननीची लाडकी आहे; तिला पाहून कन्यांनी धन्य म्हटले, राण्यांनी व उपपत्नींनी तिची प्रशंसा केली.


तुझे मुख उत्तम द्राक्षारसासमान व्हावे; तो माझ्या प्रियेप्रीत्यर्थ घशात नीट उतरतो; निद्रिस्तांच्याही तोंडांतून तो खाली सहज जातो.


असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही; महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही; मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय.


मी मारणार्‍यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणार्‍यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू ह्यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही.


ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहर्‍यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो विरूप होता),


तो माझ्याबरोबर बोलत असता मी जमिनीवर पालथा पडलो व मला गाढ निद्रा लागली; पण त्याने मला स्पर्श करून उभे केले.


मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत माझ्याकडे पुन्हा आला व जसे झोपेतून एखाद्यास जागे करतात तसे त्याने मला जागे केले.


कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.


“त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.


मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.


मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता.


त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला.


तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते; पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले दोन पुरुष दिसले.


तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात.


मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले.


म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2


स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.


पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.


तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत, अशी थोडकी नावे सार्दीस येथे तुझ्याजवळ आहेत; ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan