Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 अगे माझ्या वधू! लबानोनावरून माझ्याबरोबर, लबानोनावरून माझ्याबरोबर ये; अमानाच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोन ह्यांच्या माथ्यांवरून, सिंहांच्या गुहांतून, चित्त्यांच्या पहाडांवरून तू नजर फेक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनातून माझ्याबरोबर ये; अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सिंहाच्या गुहेतून, चित्त्याच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 माझ्या वधू, लबानोनाहून तू माझ्यासोबत ये, लबानोनाहून माझ्यासोबत ये, अमानाह डोंगराच्या माथ्यावरून, सनीर व हर्मोनच्या शिखरावरून, सिंहाच्या गुहांपासून आणि चित्ते वावरतात त्या डोंगरावरून खाली उतरून ये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 4:8
19 Iomraidhean Croise  

त्याने लबानोनावरील देवदारूपासून ते भिंतीतून उगवणार्‍या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिज्जांचे विवेचन केले; तसेच पशू, पक्षी, रांगणारे जंतू व मासे ह्यांचेही त्याने विवेचन केले.


दिमिष्कातल्या नद्या अबाना व परपर ह्या इस्राएलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यांच्यात स्नान करून मला शुद्ध होता येणार नाही काय?” असे म्हणून तो क्रोधित होऊन निघून गेला.


मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्या देशात वस्ती केली; बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर, व हर्मोन पर्वत येथपर्यंत त्यांचा विस्तार झाला.


अगे कन्ये, ऐक, लक्ष दे, कान लाव; तू आपले लोक व आपल्या बापाचे घर ही विसर,


भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो; त्याची कणसे लबानोनासारखी होवोत. नगरोनगरीचे लोक पृथ्वीवरील गवताप्रमाणे विपुल होवोत.


यहूदात देव प्रकट झाला आहे; इस्राएलात त्याचे नाव थोर आहे.


तू प्रतापी आहेस, लुटीने भरलेल्या पर्वतावर तेजस्वी आहेस.


उत्तर व दक्षिण ह्या तू उत्पन्न केल्यास; ताबोर व हर्मोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात.


भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा; आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला.”


अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत; द्राक्षीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे; माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये.


हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे; मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत; मी आपले मधूने थबथबलेले पोळे खाल्ले आहे; मी दुग्ध व द्राक्षारस ही सेवन केली आहेत; मित्रहो, खा; प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.


माझ्या वल्लभा, ऊठ, आपण गांवढ्यात जाऊ; खेड्यात रात्र घालवू.


कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो, तशी तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल.


त्यांनी सनीरच्या सरूंनी तुझी तक्तपोशी केली; तुझ्यासाठी डोलकाठी करावी म्हणून त्यांनी लबानोनाचे गंधसरू आणले.


जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.


तर मला पलीकडे जाऊ दे आणि यार्देनेपलीकडे असलेला तो उत्तम देश, तो चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन माझ्या दृष्टीस पडू दे.’


(हर्मोनाला सीदोनी लोक सिर्योन म्हणतात आणि अमोरी लोक सनीर म्हणतात.)


ज्या राजांना ठार मारून त्यांचे यार्देनेपलीकडे उगवतीकडील आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेले प्रदेश आणि पूर्वेकडील सर्व इस्राएल लोकांनी काबीज केले ते राजे हे :


Lean sinn:

Sanasan


Sanasan