Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 माझ्या प्रिये, तू सर्वांगसुंदर आहेस; तुझ्यात काही व्यंग नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 माझ्या प्रिये, तू सर्वांगी सुंदर आहेस; तुझ्यात काहीही उणीव नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 4:7
12 Iomraidhean Croise  

म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल; तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग.


राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे; तिची वस्त्रे भरजरी आहेत.


माझ्या सखे, तू सुंदर आहेस; अगे, तू सुंदर आहेस! तुझे नेत्र कपोतांसारखे आहेत.


अहा! तू सुंदर आहेस! माझ्या सखे, तू सुरूप आहेस! तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात. तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.


त्याची वाणी परम मधुर आहे; तो सर्वस्वी मनोहर आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ, माझा सखा, असा आहे!


मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे; ऐका! माझा वल्लभ दार ठोकत आहे! त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे; तो म्हणतो, “माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड; माझे डोके दवाने थबथबले आहे; माझी झुलपे रात्रीच्या दहिवरबिंदूंनी भरून गेली आहेत.”


हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्राएला, तुझे निवासमंडप किती रमणीय आहेत!


त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हांला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे.


म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा,


तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,


तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्‍यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan