Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 शिळोप्याची छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत मी गंधरसाच्या पर्वतावर, उदाच्या टेकडीवर जाऊन राहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या पर्वतावर, ऊदाच्या टेकडीवर जाईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 दिवस उजाडेपर्यंत, आणि छाया नाहीशी होईपर्यंत, मी गंधरसाच्या पर्वतावर व बोळाच्या टेकडीवर जाईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 4:6
19 Iomraidhean Croise  

मेंढ्यांच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होम मी तुला अर्पण करीन; बोकडांसह मी गोर्‍हे अर्पण करीन. (सेला)


माझ्यासाठी एक मातीची वेदी कर आणि तिच्यावर आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे ह्यांची होमार्पणे व शांत्यर्पणे कर, जेथे जेथे माझे नामस्मरण व्हावे असे मी करीन, तेथे तेथे मी तुझ्याकडे येऊन तुला आशीर्वाद देईन.


तसाच संध्याकाळी तो दिवे लावील तेव्हा त्याने धूप जाळावा; हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा.


त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवतात तसा बनवला.


शिळोप्याची वेळ, छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत राहा. माझ्या वल्लभा, हरिणाप्रमाणे, मृगीच्या पाडसाप्रमाणे वियोगपर्वतांवर फीर.


गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?


मेंदी व जटामांसी, जटामांसी व केशर, वेखंड व दालचिनी, उदाची सर्व प्रकारची झाडे, आणि गंधरस व अगरू, तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठायी आहेत.


माझ्या वल्लभा, त्वरा कर, सुगंधी वनस्पतींच्या डोंगरांवर हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा तू हो.


शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे; तिच्या योगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल.


शिवाय अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.


तरी एक प्रकारे मी तुम्हांला नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे; कारण अंधार नाहीसा होत आहे, व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे.


ह्या गोष्टींविषयी तुम्हांला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे.”


त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील कोकर्‍याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या; त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या ‘प्रार्थना’ होत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan