Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 4:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मेंदी व जटामांसी, जटामांसी व केशर, वेखंड व दालचिनी, उदाची सर्व प्रकारची झाडे, आणि गंधरस व अगरू, तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठायी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मेंदी, जटामांसी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरू व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 अगरू आणि केशर, वेखंड आणि दालचिनी, सर्व प्रकारची सुगंधी झाडे, तसेच गंधरस आणि जटामांसी आणि सर्व उत्तम मसाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 4:14
16 Iomraidhean Croise  

मग त्यांचा पिता इस्राएल त्यांना म्हणाला, “असेच असेल तर मग एवढे करा : ह्या देशात उत्पन्न होणारे मोलवान पदार्थ त्या मनुष्याला भेट म्हणून आपल्या गोणीत घालून न्या; थोडा डिंक व थोडा मध, मसाला, गंधरस, पिस्ते व बदाम घेऊन जा.


तिने राजाला एकशेवीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.


तिने राजाला एकशे वीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये नजर केली त्यांच्यासारखी पुन्हा कधी कोठून आली नाहीत.


तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे; हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करतात.


“तू उत्तम प्रकारचे मसाले घे, म्हणजे पवित्रस्थानातल्या चलनाप्रमाणे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस, त्याच्या निम्मे म्हणजे अडीचशे शेकेल सुगंधी दालचिनी, अडीचशे शेकेल सुगंधी बच,


मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी, ह्यांनी सुवासिक केली आहे.


राजा मेजाजवळ बसला असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.


गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?


शिळोप्याची छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत मी गंधरसाच्या पर्वतावर, उदाच्या टेकडीवर जाऊन राहीन.


हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे; मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत; मी आपले मधूने थबथबलेले पोळे खाल्ले आहे; मी दुग्ध व द्राक्षारस ही सेवन केली आहेत; मित्रहो, खा; प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.


माझा वल्लभ आपल्या बागेत, सुगंधी झाडांच्या ताटव्यात गेला आहे; तो उपवनात कळप चारण्यास, भुईकमळे वेचण्यास गेला आहे.


ददान व यावान हे तुझा माल घेऊन तुला सूत देत; पोलाद, तज व अगरू ही तुझ्या व्यापाराच्या मालापैकी असत.


खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत.


नंतर शब्बाथ गेल्यावर मग्दालीया मरीया, याकोबाची आई मरीया व सलोमे ह्यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधद्रव्ये विकत घेतली.


आणि येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे शंभर रत्तल मिश्रण घेऊन आला.


दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम, व ‘मनुष्यांचे जीव’ हा त्यांचा माल कोणी घेत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan