Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तुझ्या ठायी सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका अंकुरित झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तुझी रोपे मोलवान फुले असलेला डाळिंबाचा मळा अशी आहेत. त्यामध्ये कापराची व जटामांसीची झाडे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तुझी रोपे तर डाळिंबाचा मळा आहे, ज्यात सर्वोत्कृष्ट फळे, मेंदी आणि सुगंधी अगरू आहेत,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 4:13
18 Iomraidhean Croise  

वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील;


मी आपल्यासाठी बागा व त्यांत हरतर्‍हेची फळझाडे लाववली;


राजा मेजाजवळ बसला असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.


माझा वल्लभ मला एन-गेदी येथील द्राक्षीच्या मळ्यातील मेंदीच्या पुष्पगुच्छाप्रमाणे आहे.


वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला; त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले.


मेंदी व जटामांसी, जटामांसी व केशर, वेखंड व दालचिनी, उदाची सर्व प्रकारची झाडे, आणि गंधरस व अगरू, तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठायी आहेत.


हे उत्तरवायू, जागृत हो; दक्षिणवायू, तूही ये; माझ्या बागेवरून वाहा, तिचा परिमल पसर. माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करो.


खोर्‍यांतील हिरवीगार झाडेझुडपे पाहावी, द्राक्षलता फुटल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहावे म्हणून मी अक्रोडाच्या बागेत गेले होते.


माझा वल्लभ आपल्या बागेत, सुगंधी झाडांच्या ताटव्यात गेला आहे; तो उपवनात कळप चारण्यास, भुईकमळे वेचण्यास गेला आहे.


मी तुला आपल्या मातृगृही घेऊन गेले असते, तू मला शिकवले असतेस, मसाला घातलेला द्राक्षारस, माझ्या डाळिंबाचा रस मी तुला पिण्यास दिला असता.


तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,


कारण भूमी जशी आपले अंकुर उगवते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवेसे करतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत नीतिमत्ता व कीर्ती अंकुरित करील.


ते एकमेकांना रेटून चालत नाहीत; ते आपापल्या वाटेने जातात; समोर शस्त्रे असता ते जखम न होता त्यांतून पार जातात.


तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी जेवायला बसला असता कोणीएक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली; तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली.


तेव्हा मरीयेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले; तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले.


आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan