Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 माझे वधू! तुझ्या ओठांतून मधु स्रवतो; तुझ्या जिव्हेखाली मधु व दुग्ध आहेत; तुझ्या वस्त्रांचा सुवास लबानोनाच्या सुगंधासारखा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना लबानोनाच्या वासासारखा गोड सुवास आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 माझ्या वधू, तुझे ओठ मधाच्या पोळ्याप्रमाणे मध गाळतात; दूध आणि मध तुझ्या जिभेखाली आहेत. तुझ्या वस्त्रांचा सुगंध लबानोनाच्या सुगंधासारखा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 4:11
19 Iomraidhean Croise  

त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले; तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा : पाहा, परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे;


ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणार्‍या मधापेक्षा गोड आहेत.


तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे; हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करतात.


जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील.


ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत.


म्हणून तू माझ्या ज्ञानशिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे.


कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते;


अगे माझे भगिनी, माझे वधू! तुझे प्रेम किती मनोरम आहे! तुझे प्रेम द्राक्षारसाहून कितीतरी मधुर आहे! तुझ्या उटण्यांचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्यांहून मधुर आहे!


तुझे ओठ किरमिजी सूत्रासमान आहेत; तुझे मुख रम्य आहे; तुझ्या बुरख्यातून तुझी कानशिले डाळिंबाच्या फाकेसमान दिसतात.


हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे; मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत; मी आपले मधूने थबथबलेले पोळे खाल्ले आहे; मी दुग्ध व द्राक्षारस ही सेवन केली आहेत; मित्रहो, खा; प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.


त्याचे गाल सुगंधोत्पादक वनस्पतींचे ताटवे आहेत. त्याचे ओठ कमलांप्रमाणे असून त्यांतून गंधरस स्रवतो.


तुझे मुख उत्तम द्राक्षारसासमान व्हावे; तो माझ्या प्रियेप्रीत्यर्थ घशात नीट उतरतो; निद्रिस्तांच्याही तोंडांतून तो खाली सहज जातो.


वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्याला समजू लागले म्हणजे तो लोणी व मध सेवन करील.


तुम्ही शब्दांनिशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.


म्हणून त्याचे नाव पत्करणार्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan