Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अहा! तू सुंदर आहेस! माझ्या सखे, तू सुरूप आहेस! तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात. तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबुतर असे आहेत. तुझे केस गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 किती सुंदर आहेस तू, माझ्या प्रिये! आहा, किती सुंदर आहेस! तुझ्या पडद्याआड तुझे नयन कबुतरे आहेत. तुझे केस त्या शेरडांच्या कळपाप्रमाणे आहेत ज्या गिलआदाच्या टेकड्यांवरून झळकतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 4:1
17 Iomraidhean Croise  

म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल; तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग.


माझ्या सखे, तू सुंदर आहेस; अगे, तू सुंदर आहेस! तुझे नेत्र कपोतांसारखे आहेत.


माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल.


अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे; कारण तुझा कंठ मधुर आहे; तुझे मुख रम्य आहे.


तू माझ्यावरून आपले डोळे काढ; त्यांनी मला घाबरे केले आहे; तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.


तुझ्या बुरख्यातून तुझी कानशिले डाळिंबाच्या फाकेसमान दिसतात.


तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे; तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत; तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे.


कारण यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वर म्हणतो : तू मला गिलाद, लबानोनाचे शिखर असे आहेस; मी तुला खातरीने ओसाड भूमीसारखे, निर्जन नगरासारखे करीन.


तुझ्या सौंदर्यामुळे तुझी कीर्ती राष्ट्रांत पसरली; कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार; तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडीत एकान्ती राहतात त्यांना चार; प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे.


रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती; याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले.


तेव्हा मोशेने मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांना गिलाद प्रदेश दिला आणि ते तेथे राहू लागले.


मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan