Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 पाहा, तो शलमोनाचा मेणा येत आहे; त्याच्याबरोबर साठ वीर पुरुष चालत आहेत; ते इस्राएलाच्या वीर पुरुषांपैकी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पाहा, ती शलमोनाची पालखी येत आहे. त्याच्यासभोवती साठ सैनिक आहेत, ते साठजण इस्राएलाच्या सैनिकांपैकी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पाहा! ही तर शलोमोनाची पालखी आहे! इस्राएलातील निवडलेल्या साठ योद्ध्याच्या दलाच्या पहाऱ्यात आलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 3:7
12 Iomraidhean Croise  

रहबाम राजाने त्यांच्याऐवजी पितळेच्या ढाली बनवल्या आणि राजाच्या स्वारीपुढे धावणार्‍यांच्या व राजवाड्याची रखवाली करत होते त्यांच्या स्वाधीन त्या केल्या.


पण इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने दास करून ठेवले नाही; ते योद्धे, कामदार, सरदार, सेनापती आणि रथ व स्वार ह्यांवरचे अधिपती होते.


अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले.


ह्या कारणास्तव लोकांच्या हाती तलवारी, बरच्या व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यांना ठेवले.


माझ्या वल्लभा, तूच सुरूप आहेस; तूच मनोहर आहेस; आमचा मंचक पर्णशय्या आहे.


गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?


ते सर्व खड्गधारी व युद्धप्रवीण आहेत; रात्रीच्या समयी प्राप्त होणार्‍या भयास्तव प्रत्येकाच्या कमरेला तलवार लटकत आहे.


शलमोन राजाने आपणासाठी लबानोनी लाकडाचा एक मेणा करवला आहे.


ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?


शौलाची आयुष्यभर पलिष्ट्यांशी बिकट लढाई चालू राहिली; ह्यास्तव शौलाला कोणी पराक्रमी अथवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या पदरी ठेवून घेई.


दावीद आखीशाला म्हणाला, “आपला दास काय करील ते आपल्याला आता समजून येईल.” आखीश दाविदाला म्हणाला, “म्हणूनच मी तुला माझे शिर सलामत राखायला कायमचा ठेवून घेतो.” शौल आणि एन-दोर येथील भूतविद्याप्रवीण स्त्री


तो तुमचे दास व दासी, तुमची खिल्लारे1 व गाढवे धरून आपल्या कामावर लावील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan