Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मनुकांची पोळी देऊन माझ्या जिवाला आराम द्या; सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. मी प्रेमज्वराने पीडित झाले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलते) मनुकांची पोळी देऊन माझ्यात शक्ती आणा. सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा. कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मनुक्यांनी मला बळ द्या, सफरचंदांनी मला ताजेतवाने करा, कारण प्रेमात मी दुर्बल झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 2:5
14 Iomraidhean Croise  

मग त्याने सर्व प्रजेला म्हणजे इस्राएलाच्या समुदायातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकेक भाकर, मांसाचा एकेक तुकडा, खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली. मग सर्व लोक घरोघर गेले.


त्याने इस्राएलाच्या प्रत्येक स्त्रीपुरुषास एकेक भाकर, एकेक मांसाचा तुकडा व खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली.


माझ्या जिवाने तुझी कास धरली आहे; तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो;


यरुशलेमाच्या कन्यांनो, मी तुम्हांला शपथ घालून विनंती करते की माझा वल्लभ तुम्हांला आढळला तर त्याला सांगा मी प्रेमज्वराने पीडित आहे.


मी म्हटले, मी तालवृक्षावर चढून त्याच्या शाखा धरीन; तेव्हा तुझे कुच मला द्राक्षांच्या घोसांसमान व्हावेत, आणि तुझ्या नासिकेचा श्वास सफरचंदाच्या सुवासासमान व्हावा.


मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.”


तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”


मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan