Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्याने मला आपल्या पानगृहात आणले; त्याने माझ्यावर प्रेमध्वजा फडकावली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्याने मला मेजवानीच्या घरात आणले, आणि माझ्यावर त्याच्या प्रेमाचा झेंडा फडकावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याने मला आपल्या मेजवानगृहात आणावे, त्याच्या प्रेमाचा ध्वज माझ्यावर असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 2:4
16 Iomraidhean Croise  

तेव्हा राजा क्रोधायमान होऊन भोजनावरून उठला व राजमंदिराच्या बागेत गेला; तेव्हा ‘मला प्राणदान द्या’ अशी विनवणी करीत हामान एस्तेर राणीपुढे उभा राहिला; कारण राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे हे त्याला समजून चुकले.


तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व ह्याभोवती तू कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना?


तुला मिळालेल्या तारणामुळे आम्ही उत्सव करू; आमच्या देवाच्या नावाचा ध्वज उभारू; तुझ्या सर्व मागण्या परमेश्वर पूर्ण करो.


तुझे भय बाळगणार्‍यांना तू ध्वज दिला आहेस; अशासाठी की, तो त्यांनी सत्यासाठी फडकवावा. (सेला)


खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.


शलमोनाने रचलेले गीतरत्न.


माझ्या चित्ताचे आकर्षण कर, म्हणजे आम्ही तुझ्यामागून धावत येऊ. राजाने मला अंत:पुरी आणले आहे. आम्ही तुझ्या ठायी आनंदोत्सव करू; तुझे प्रेम द्राक्षारसाहून अधिक वर्णू; त्या एकनिष्ठपणे तुझ्यावर प्रीती करीत आहेत.


हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे; मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत; मी आपले मधूने थबथबलेले पोळे खाल्ले आहे; मी दुग्ध व द्राक्षारस ही सेवन केली आहेत; मित्रहो, खा; प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.


माझ्या सखे, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर, यरुशलेमेप्रमाणे सुरेख आहेस; ध्वजा फडकवणार्‍या सेनेसारखी तू हैराण करणारी आहेस.


त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमार्‍याला राष्ट्रे शरण येतील; त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.


पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan