Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत; पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे; आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 भूमीवर फुले दिसत आहेत, पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे. आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पृथ्वीवर फुले उमलली आहेत; गाण्याचा ऋतू आला आहे, कबुतरांचे गीत आमच्या देशात ऐकू येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 2:12
17 Iomraidhean Croise  

त्याने त्याला सांगितले, “तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिलू माझ्यासाठी घे.”


तू आपल्या कबुतराला श्वापदापुढे टाकू नकोस; आपल्या दीन जनांच्या प्राणांचा विसर कायमचा पडू देऊ नकोस.


ज्या लोकांना उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.


पाहा, हिवाळा गेला आहे; पाऊस संपून गेला आहे;


खोर्‍यांतील हिरवीगार झाडेझुडपे पाहावी, द्राक्षलता फुटल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहावे म्हणून मी अक्रोडाच्या बागेत गेले होते.


माझा वल्लभ आपल्या बागेत, सुगंधी झाडांच्या ताटव्यात गेला आहे; तो उपवनात कळप चारण्यास, भुईकमळे वेचण्यास गेला आहे.


तसे तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने मिरवत जाल; पर्वत व टेकड्या तुमच्यापुढे जयघोष करतील; वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील.


आकाशातील करकोची आपला नेमलेला समय जाणते; होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळचे स्मरण ठेवतात; पण माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखत नाहीत.


ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो; परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan