Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 1:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 माझ्या सखे, मी तुला फारोच्या रथाच्या घोडीसारखा लेखतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यांतल्या एका घोडीशी मी तुझी तुलना करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 माझ्या प्रिये, फारोहच्या रथामधील घोडीशी, मी तुझी तुलना करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 1:9
13 Iomraidhean Croise  

त्याच्याबरोबर रथ व स्वार गेले; असा तो मोठा समुदाय निघाला.


शलमोनाचे घोडे मिसर देशातून येत; राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकेका तांड्याची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत;


माझ्या सखे, तू सुंदर आहेस; अगे, तू सुंदर आहेस! तुझे नेत्र कपोतांसारखे आहेत.


माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल.


अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत; द्राक्षीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे; माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये.


काटेरी झुडपांमध्ये जसे भुईकमळ तशी इतर युवतींमध्ये माझी सखी आहे.


अहा! तू सुंदर आहेस! माझ्या सखे, तू सुरूप आहेस! तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात. तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.


माझ्या प्रिये, तू सर्वांगसुंदर आहेस; तुझ्यात काही व्यंग नाही.


मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे; ऐका! माझा वल्लभ दार ठोकत आहे! त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे; तो म्हणतो, “माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड; माझे डोके दवाने थबथबले आहे; माझी झुलपे रात्रीच्या दहिवरबिंदूंनी भरून गेली आहेत.”


माझ्या सखे, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर, यरुशलेमेप्रमाणे सुरेख आहेस; ध्वजा फडकवणार्‍या सेनेसारखी तू हैराण करणारी आहेस.


जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!


Lean sinn:

Sanasan


Sanasan