Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 1:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 माझ्या प्राणसख्या, मला सांग : तू आपला कळप कोठे चारतोस? दुपारी तो कोठे बसवतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मी का भ्रमत राहावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग: तो तू तुझा कळप कोठे चारतोस? तू तुझ्या कळपाला दुपारी कोठे विसावा देतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपाजवळ भटकणाऱ्यांसारखी मी का व्हावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी तुझ्यावर प्रेम करते, तर तूच मला सांग, तुझा कळप तू कुठे चरावयास नेतो आणि मध्यानाच्या वेळी तू तुझ्या मेंढ्यांना कुठे विसाव्याला लावतोस. पडद्यात असलेल्या स्त्रीप्रमाणे तुझ्या सोबत्यांच्या कळपाच्या बाजूला मी का असावे?

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 1:7
33 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “मी आपल्या भावांना शोधत आहे. ते कोठे कळप चारत आहेत तेवढे मला सांगा.”


मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी विनवणी ऐकतो.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.


हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नकोस; तू माझ्याशी मौन धरल्यास गर्तेत पडणार्‍यांसारखी माझी गती होईल.


हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर.


माझा वल्लभ माझा, व मी त्याची; तो आपला कळप भुईकमळांत चारत आहे.


वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला; त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले.


माझा वल्लभ गोरापान व लालबुंद आहे; तो लाखात मोहरा आहे.


त्याची वाणी परम मधुर आहे; तो सर्वस्वी मनोहर आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ, माझा सखा, असा आहे!


यरुशलेमाच्या कन्यांनो, मी तुम्हांला शपथ घालून विनंती करते की माझा वल्लभ तुम्हांला आढळला तर त्याला सांगा मी प्रेमज्वराने पीडित आहे.


माझा वल्लभ आपल्या बागेत, सुगंधी झाडांच्या ताटव्यात गेला आहे; तो उपवनात कळप चारण्यास, भुईकमळे वेचण्यास गेला आहे.


मी आपल्या वल्लभाची आहे, व माझा वल्लभ माझा आहे; तो आपला कळप भुईकमळांमध्ये चारतो.


अगे बागांत राहणारे, तुझ्या सख्या तुझे शब्द ऐकण्यास आतुर झाल्या आहेत; मलाही ते ऐकव.


त्यात पुन्हा कधी वस्ती होणार नाही, पिढ्यानपिढ्या त्यात कोणी राहणार नाही; अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत; मेंढपाळ आपले कळप तेथे बसवणार नाहीत.


रात्री माझ्या जिवास तुझी उत्कंठा लागली; मी अगदी अंत:करणपूर्वक तुझा शोध करीन; कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे नीतिमत्ता शिकतात.


मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्‍यांना सांभाळून नेईल.


मी आपल्या वल्लभाप्रीत्यर्थ गाणे गाईन; आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षीच्या मळ्याविषयीचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक शृंगावर होता;


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जे हे स्थळ ओसाड आहे व ज्यात मनुष्य व पशू ह्यांचा मागमूस नाही त्याच्या सर्व नगरांत मेंढपाळ आपले कळप बसवण्यासाठी पुन्हा वाडे करतील.


तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल.


जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही;


मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो.


तिसर्‍यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय?” “माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.


त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.


म्हणून तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांना ती मूल्यवान आहे; परंतु जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना, “बांधणार्‍यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला,”


आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.


कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा ‘मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍यांजवळ नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.”’


मग मवाबी रूथने सांगितले की, “तो मला असेही बोलला की, ’माझे गडी सर्व कापणी करीपर्यंत त्यांच्या मागोमाग राहा.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan