Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी काळीसावळी आहे हे मनात आणू नका, कारण मी उन्हाने होरपळले आहे. माझे सहोदर बंधू माझ्यावर संतप्त झाले; त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्यांची राखण करण्यासाठी ठेवले; पण माझ्या स्वत:च्या मळ्याची राखण मी केली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका. कारण सूर्याने मी होरपळले आहे. माझे स्वतःचे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला द्राक्षांच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले. परंतु मी आपल्या स्वत:च्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मी सावळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका, कारण मी सूर्यामुळे काळवंडले आहे. माझ्या आईची मुले माझ्यावर रागावली आणि त्यांनी मला द्राक्षमळ्याची राखण करावयास लावले; पण मी स्वतःच्या द्राक्षमळ्याकडे दुर्लक्षित केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 1:6
15 Iomraidhean Croise  

माझी त्वचा काळी होऊन गळून पडत आहे; माझी हाडे तापाने जळजळत आहेत.


मी आपल्या भावांना नवखा, माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे.


कारण तुझे भाऊबंद व तुझ्या बापाचे घराणे हीदेखील तुझ्याशी बेइमानपणे वागली आहेत; त्यांनीदेखील तुझ्यावर शब्दांचा भडिमार केला आहे; ती तुझ्याशी गोड बोलली तरी त्यांचा विश्वास धरू नकोस.”


माझ्या लोकांच्या कन्येच्या घायाने मी घायाळ झालो आहे, मी सुतकी आहे; महाभयाने मला घेरले आहे.


त्यांचा चेहरा काळोखाहून काळा झाला आहे; त्यांना आळ्यांतून कोणी ओळखत नाही; त्यांची त्वचा त्यांच्या हाडांना चिकटली आहे; ती शुष्क झाली आहे, काष्ठासारखी झाली आहे.


कारण पुत्र बापाला तुच्छ मानत आहे, मुलगी आपल्या आईवर उठली आहे, सून आपल्या सासूवर उठली आहे; मनुष्याच्या घरचे इसम त्याचे वैरी झाले आहेत.


आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.


शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील?


आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले; व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले.


आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’


परंतु त्या वेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan