गीतरत्न 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 माझ्या चित्ताचे आकर्षण कर, म्हणजे आम्ही तुझ्यामागून धावत येऊ. राजाने मला अंत:पुरी आणले आहे. आम्ही तुझ्या ठायी आनंदोत्सव करू; तुझे प्रेम द्राक्षारसाहून अधिक वर्णू; त्या एकनिष्ठपणे तुझ्यावर प्रीती करीत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ. (तरुणी स्वतःशीच बोलते) राजाने मला त्याच्या अंतःपुरात आणले आहे. (तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) मी आनंदीत आहे. मी तुझ्याविषयी आनंदीत आहे. मला तुझे प्रेम साजरे करू दे. ते द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 चल घाई करू या! मला तुझ्याबरोबर दूर घेऊन जा! राजाने मला आपल्या अंतःपुरात न्यावे. आम्ही तुझ्यामध्ये उल्हास आणि हर्षित होऊ; आम्ही द्राक्षारसापेक्षा तुझी अधिक प्रशंसा करू. त्यांनी तुझ्यावर प्रीती करणे किती यथार्थ आहे! Faic an caibideil |