Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गीतरत्न 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो; तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय; म्हणूनच कुमारी तुझ्यावर प्रेम करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे, तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुझ्या अत्तरांचा सुगंध सुखदायक आहे; तुझे नाव ओतलेल्या अत्तरासारखे आहे. तरुण कुमारी तुझ्यावर प्रेम करतात यात आश्चर्य नाही!

Faic an caibideil Dèan lethbhreac




गीतरत्न 1:3
26 Iomraidhean Croise  

ते मस्तकावर ओतलेल्या, अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या, त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे;


तिला कशिद्याची वस्त्रे नेसवून राजाकडे मिरवत नेतील, तिच्यामागून चालणार्‍या कुमारींना तिच्या सख्या तुझ्याकडे आणतील.


मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा, तू मला म्हणतोस की, ‘ह्या लोकांना घेऊन जा’; पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की, ‘मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखतो, आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.’


तो म्हणाला, “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; तुझ्यासमोर ‘परमेश्वर’ ह्या नावाची मी घोषणा करीन; ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन.


तेल व सुगंधी द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणार्‍या मित्राचे माधुर्य होय.


सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.


गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?


अगे माझे भगिनी, माझे वधू! तुझे प्रेम किती मनोरम आहे! तुझे प्रेम द्राक्षारसाहून कितीतरी मधुर आहे! तुझ्या उटण्यांचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्यांहून मधुर आहे!


त्याचे गाल सुगंधोत्पादक वनस्पतींचे ताटवे आहेत. त्याचे ओठ कमलांप्रमाणे असून त्यांतून गंधरस स्रवतो.


मी आपल्या वल्लभासाठी दार उघडायला उठले तेव्हा अडसराच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातांना लागला, माझ्या बोटांवरून त्याचा द्रव थिबकला.


साठ राण्या, ऐंशी उपपत्नी, आणि अगणित कुमारी आहेत;


सीयोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे; खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे; ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे.


तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल; त्या आपले दिवे घेऊन वराला सामोर्‍या जाण्यास निघाल्या.


तेव्हा मरीयेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले; तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले.


कारण तुमच्याविषयीची माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे; मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हांला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.


मला सर्वकाही आहे व ते विपुल आहे; एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक1 यज्ञ, असे आहे.


स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan