रूथ 4:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 वतन सोडवणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्राएल लोकांत प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायतण काढून दुसर्यास देत असे; प्रमाण पटवण्याची इस्राएल लोकांत हीच चाल होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची पूर्वी इस्राएलात अशी पद्धत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्याला देत असे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 (इस्राएलमध्ये पूर्वीच्या काळात, मालमत्तेची सोडवणूक करणे आणि तिचे हस्तांतरण पक्के होण्यासाठी, एका पक्षाने त्याची चप्पल काढून ती दुसऱ्याला देणे ही इस्राएलमधील व्यवहार कायदेशीर करण्याची पद्धत होती.) Faic an caibideil |